The psychosis has made the city mad
The psychosis has made the city mad 
पश्चिम महाराष्ट्र

मनोरुग्णाने नगरकरांचा लावलयं याड!

सूर्यकांत वरकड

नगर : तो माणूस इथं दिसला... आत्ता इथंच फिरत व्हता... पोलिसांना फोन करा... आले का पोलिस?... साहेब इथून गेला... गेल्या चार दिवसांपासून हा "आला'-"गेला'चा खेळ सुरू आहे. यात पोलिसांची नाहक दमछाक होत आहे, तर अफवांमुळे नगरकरांच्या मनात बसलेली भीती दूर व्हायला तयार नाही.


निर्मलनगर येथील एका परप्रांतीय तरुणाला चावा घेणारा नेमका मनोरुग्ण आहे की, आणखी काही... याबाबत अद्यापि कोणालाही काहीच माहिती नाही. त्याने सावेडी नाका, बोल्हेगाव परिसरात अनेकांना चावा घेतल्याची चर्चा आहे. परंतु अद्यापि परप्रांतीय तरुण वगळता एकाही व्यक्तीस त्या मनोरुग्णाने चावा घेतल्याची पोलिसांकडे माहिती नाही किंवा माध्यमांकडेही कोणी दावा केलेला नाही, तरीही अफवांचे पीक काही कमी नाही. सोशल मीडियात त्या मनोरुग्णाचीच चर्चा आहे.


गेल्या दोन दिवसांपासून तो पाइपलाइन रोड, गावडे मळा, बोल्हेगाव, एमआयडीसी, श्रीराम चौक, गुलमोहर रोड, कोहिनूर मंगल कार्यालय आदी परिसरात दिसल्याचे फोन पोलिस नियंत्रण कक्षात गेले. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, तो येथून निघून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पोलिसांची नुसती दमछाक सुरू आहे.
दरम्यान, आज तोफखाना पोलिसांची दोन पथके सावेडी उपनगरामध्ये गस्तीवर आहेत.

सोशल मीडियावर अफवा
तो माणूस पिसाळला आहे. आताच एका मुलीला त्याने चावा घेतलाय... कोहिनूर मंगल कार्यालयाजवळील काट्यात दडून बसला आहे, अशा अफवा पसरविल्या जातात. काही तर कुठली तरी जुनी छायाचित्रही एकमेकांना शेअर करतात. यामुळे रात्रीच नव्हे ,तर दिवसाही उपनगरात एकटे फिरण्यास नगरकर धजत नाहीत.


कोट
पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. मात्र, तो व्यक्ती आढळून आला नाही अथवा त्याला कोणी पाहिल्याचा दावाही करीत नाही. त्यामुळे अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये. पोलिस आपल्या मदतीला आहेत, घाबरण्याचे कारण नाही.
- पी. एच. मुलानी,
पोलिस निरीक्षक, तोफखाना


त्या दिवशी नेमकं काय घडलं?
गाडेकर चौकात परप्रांतीय मुलं राहतात. त्यातील तिघे त्या दिवशी नैसर्गिक विधीसाठी गेले होते. काटवनातून एका माणसाने त्यातील एकाच्या अंगावर पाठीमागून झडप घातली. खाली पाडून त्याच्या अंगावर बसला आणि श्‍वानासारखा चावा घेऊ लागला. हा प्रकार पाहून त्याचे मित्र गोंधळून गेले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर परिसरातील लोक धावून आले. त्यांनी दगडफेक केल्यानंतर तो चावणारा इसम काटवनात पळून गेला. आमदार संग्राम जगताप यांनी त्या जखमी तरुणाची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार उपस्थित होते. त्या वेळी त्या तरुणानेच वरील हकिगत कथन केल्याची माहिती वारे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT