सातारा - पोवई नाका येथे शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र शब्दांत हल्ल्याचा निषेध नोंदविला.
सातारा - पोवई नाका येथे शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र शब्दांत हल्ल्याचा निषेध नोंदविला. 
पश्चिम महाराष्ट्र

मिलिटरी अपशिंग्यात काळजीच्या छटा अन्‌ तीव्र भावना

सुनील शेडगे

नागठाणे - देशाला आजवर हजारो सैनिक देणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात काश्‍मीरमधील घटनेनंतर आज वातावरण सुन्न होते. त्याचबरोबर काळजीच्या छटा होत्या अन्‌ संतापाचा सूरदेखील!

अपशिंगे म्हणजे सैनिकांचे गाव. आजही येथील युवापिढीचा सैनिकी परंपरेकडे असलेला ओढा कायम आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने गावातील युवक सैन्यात भरती होतात. त्यातील बहुतेक सेवेच्या पहिल्या टप्प्यात सीमेवर कार्यरत असतात. सध्याही येथील सैनिक सीमेवर असणाऱ्या वेगवेगळ्या युनिटमध्ये सहभागी आहेत. ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत असलेल्या गावातील सैनिकांची संख्या ४० च्या घरात आहे. काश्‍मीरमधील घटनेनंतर गावात सुन्न वातावरण होते. सैनिकांच्या कुटुंबीयांतही अस्वस्थता होती. संपर्क साधण्याच्यादृष्टीने फोन सुरू होते. या घटनेनंतर संतापही व्यक्त होत होता. जम्मू-काश्‍मीरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

कोणताही राजकीय मुद्दा न करता अतिरेक्‍यांचा कायम बिमोड होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत निकम यांनी व्यक्त केली.

गावात आज बंद
दरम्यान, आज येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. उद्या (शनिवारी) गावातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT