Raids on bogus dentists in Solapur
Raids on bogus dentists in Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील बोगस दंतवैद्यांवर छापे 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहर व परिसरातील बोगस दंतवैद्यांवर महापालिकेच्या पथकाकडून लवकरच छापे टाकले जाणार आहेत. त्यासाठी आयुक्त दीपक तावरे यांनी 'ग्रीन सिग्नल' दिला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 'सकाळ'ला दिली. 

शहर व परिसरात तब्बल 11 बोगस दंतवैद्य असल्याची यादी महापालिकेस प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांची तपासणी करण्यात येणार असून, बोगस दंतवैद्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. राज्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष धोरण निश्‍चित केले आहे. त्याअंतर्गत अशा व्यावसायिकांना शोधून काढण्यासाठी तालुका, जिल्हा व महापालिका स्तरावर समित्या नियुक्‍त करण्यात आल्या आहेत. राज्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अनधिकृत डेंटल लॅब चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची याचिका न्यायालयात दाखल झाली होती. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महापालिकेला आपापल्या क्षेत्रातील बोगस दंतवैद्य शोधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बोगस वैद्यकीय व्यावसायिकाविरुद्ध कारवाई केली जाते, मात्र अशा व्यावसायिकांत बोगस दंतवैद्य, दंत कारागिर, दंतआरोग्य रक्षकांचा समावेश नव्हता. आता शासनाने विशेष आदेश काढून अशा बोगस व्यक्ती व संस्थाविरुद्ध कारवाई करून न्यायालयात तक्रार करण्याचे अधिकार या समित्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार समितीने कामकाज सुरू केले असून, आयुक्तांच्या नियंत्रणात या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. 

शासनाच्या आदेशानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे कारवाई थांबली होती, आता आयुक्तांनी कारवाईला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येणार असून, बोगस दंतवैद्य आढळल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी करण्यात येईल. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT