politics.jpg
politics.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पावसाचा कहर निवडणूकीवर असर

रुपेश कदम

दहिवडी : पावसाने जाहीर प्रचारावर पाणी फेरले असतानाच काल रात्रीपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे छुप्या प्रचारालाही अडथळा निर्माण झाला आहे. असाच पाऊस मतदानादिवशी राहिला तर काय होणार? या प्रश्नाने उमेदवार चिंताग्रस्त झाले आहेत.

विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे ठिकठिकाणच्या सभा उधळल्या तर पदयात्रा रोखल्या. तर याच पावसामुळे सातारची शरद पवार यांची सभा संपुर्ण महाराष्ट्रात गाजली. अनेक उमेदवारांना आपले नियोजित कार्यक्रम नाईलाजाने बदलावे लागले. तर कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला.

दरम्यान, शनिवारी (ता. 19 ऑक्टोबर) या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती. अधूनमधून विश्रांती घेत दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सांगता सभांच्या गर्दीवर याचा मोठा परिणाम झाला. अपेक्षित गर्दी जमविताना उमेदवारांना नाकी नऊ आले. महत्प्रयास करुन अपेक्षित गर्दी जमविण्यात अनेकांना अपयश आले. तर काही ठिकाणी उमेदवारांनी भर पावसात सभा घेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी सुरु झालेला पाऊस रिमझिम स्वरुपात रात्रभर सुरुच होता. त्यामुळे रात्री योग्य ठिकाणी रसद पोहचविताना कार्यकर्त्यांना अडचण आली. पाण्याने, चिखलाने रस्ते अडविल्याने अनेकांना रात्री सावजांची शिकार करता आली नाही. रात्री सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासून मोठा जोर धरला आहे. सकाळपासूनच जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंत्रणा कार्यरत करण्यात उमेदवार व प्रशासन यांच्यापुढे समस्या निर्माण झाली आहे. आज दिवसात यंत्रणेला कशी चालना देणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. 

अशातच उद्या मतदानादिवशीची उमेदवारांना मोठी चिंता भेडसावू लागली आहे. पावसाचा कहर सुरु राहिल्यास मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविताना मोठी कसरत होणार आहे. कदाचित याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होवून ती घसरु शकते. या घसरलेल्या टक्केवारीचा फटका आपल्याला बसू नये याची काळजी उमेदवारांना घ्यावी लागणार आहे. पावसावर मात करुन हक्काचं मतदान करुन घेण्यासाठी उमेदवारांना आजच कंबर कसावी लागणार यात शंका नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT