Raj Thackeray
Raj Thackeray Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का; न्यायालयाकडून दोषमुक्त करण्याचा विनंती अर्ज नामंजूर!

धर्मवीर पाटील

मनसेचे नेते राज ठाकरे यांचा शिराळा न्यायालयातील आरोपातून दोषमुक्त होण्याबाबत दाखल केलेला अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

इस्लामपूर - मनसेचे नेते राज ठाकरे यांचा शिराळा न्यायालयातील आरोपातून दोषमुक्त होण्याबाबत दाखल केलेला अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. आज याप्रकरणी इस्लामपूर येथील न्यायालयात सुनावणी झाली.

राज ठाकरे यांच्याविरुध्द कोकरुड (ता. शिराळा) पोलिस ठाण्यात २१ ऑक्टोबर २००८ ला कलम १४३, १०९ व ११७ व मुंबई पोलिस अधिनियम कलम १३५ अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली होती. यावरुन राज ठाकरे यांच्याविरुध्द शिराळा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. राज ठाकरे यांच्याविरुध्द अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. या आरोपातून दोषमुक्त करावे यासाठी राज ठाकरे यांच्यावतीने इस्लामपूर येथील जिल्हा न्यायाधिश यांचाकडे कोर्टात रिव्हिजन अर्ज दाखल होता.

राज ठाकरे यांच्याकडून दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. यामुळे त्यांचेविरुध्द दोषारोप दाखल न करण्याचा युक्तीवाद केलेला होता. सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकिल रणजित पाटील यांनी काम पाहिले. राज ठाकरे यांच्या दाखल असलेल्या तक्रारीत त्यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत जोपर्यंत केसमधील साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सहभागाबाबत मत नोंदविता येणार नाही.

तसेच ही फिर्याद ही सन २००८ साली दाखल असल्याने आजरोजीपर्यंत आरोपीचे वतीने दोषारोपपत्र दाखल होण्याबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही. यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोप ठेवून ही फिर्याद गुणदोषावरती चालणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा दोषमुक्त होणेचा अर्ज नामंजूर व्हावा, असा युक्तीवाद रणजित पाटील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा न्यायाधीशांनी राज ठाकरे यांचा दोषमुक्त होणेबाबतचा अर्ज नामंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT