पश्चिम महाराष्ट्र

सूर्यास्त, लाटा अन्‌  सेल्फी पॉईंट

सकाळवृत्तसेवा

फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव आणि हार्ट ऑफ सिटी असलेल्या रंकाळा तलावाच्या संध्यामठ नजीकच्या बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे नयनरम्य निसर्ग सौंदर्य, रंकाळ्यातील पाण्याच्या लाटा पहात, सेल्फी घेत पर्यटक व शहरवासीय रंकाळ्यावर मनमुराद आनंद लुटत आहेत.

कोल्हापूरचा रंकाळा निसर्गाचा अद्‌भूत नजराणा आहे. सकाळी सूर्योदयावेळी व सायंकाळी सूर्यास्ताप्रसंगी रंकाळा तलावाचे क्षणाक्षणाला बदलणारे रूप लोकांना मोहून टाकते. सूर्याची किरणे रंकाळ्याच्या पाण्यावर पडली की बदलते रूप मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी लोक धडपडत असतात. दरवर्षी मे महिन्यात रंकाळ्याचे पाणी कमी झाले की तलावात असलेल्या संध्यामठाजवळ नैसर्गिक बेट तयार होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या बेटाचे हिरवळीवर पर्यटकांची गर्दी होत आहे. पाण्यात पाय सोडून, दगडावर बसून पर्यटन रंकाळा चौपाटी व शालिनी पॅलेस पाहत आनंद घेतात. जवळच पौराणिक संध्यामठची वास्तू आहे. या वास्तूत महादेवाची व गणेशाची मूर्ती आहे. 

या मूर्तीचे आता दर्शन होऊ लागले आहे. मात्र, सध्या पाणी असल्याने संध्यामठाच्या वास्तूपर्यंत जाता येत नाही. संध्यामठाची पौराणिक, ऐतिहासिक, कोरीव दगडातील वास्तू ही रंकाळ्याचे वैभव आहे. पडझड झालेली ही वास्तू जतन करण्यासाठी तिचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. 

संध्यामठाच्या नैसर्गिक अस्तित्वाला धक्का न पोचवता संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा ठेवा पुन्हा आपण निर्माण करू शकत नाही म्हणून तो जपला पाहिजे. परवाच विविध संस्थांच्या वतीने येथील हिरवळीवर रंकाळा व संध्यामठ याची माहिती सांगण्यात आली. विविध मंडळांच्या वतीने संध्यामठ परिसराची सातत्याने स्वच्छताही केली जात आहे. लोकांच्या स्तरावर स्वच्छता व रंकाळा प्रदूषण दूर करण्याच्या कामात  मर्यादा पडताहेत. 

शासन व पालिकेने पुढाकार घेऊन आधुनिक मशिनरीची यंत्रणा घेऊन स्वच्छता व प्रदूषण दूर करण्याची गरज आहे. लोकांनीही स्वच्छ व सुंदर रंकाळा राहण्यासाठी विशेष योगदान  द्यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT