RCU cancelled exam result declared in belgaum
RCU cancelled exam result declared in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात आरसीयूच्या ‘रद्द’ परीक्षांचा निकाल जाहीर

सतीश जाधव

बेळगाव : कोरोनामुळे रद्द झालेल्या पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील तर पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील परीक्षांचा निकाल राणी चन्नमा विद्यापीठाने शनिवारी (ता. १६) जाहीर केला आहे. इंटर्नल व गेल्या सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे २२ मार्चपासून महाविद्यालये बंदच करण्यात आली होती. मे महिन्यादरम्यान पदवीच्या तिसऱ्या व पदव्युत्तरच्या दुसऱ्या म्हणजेच फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार परीक्षाही घेण्यात आल्या. तसेच इतर परीक्षा रद्द करून लवकरच निकाल जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊन महिनाभरात निकालही लावण्यात आला होता. तरीही रद्द झालेल्या परीक्षांचा निकाल लागला नव्हता.

निकाल कोणत्या आधारावर लावणार, याचे चित्रही स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे, विद्यार्थीही बुचकळ्यात सापडले होते. विद्यापीठाने लवकर निकाल लावावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात होती. अखेर निकाल जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. विद्यापीठाने स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून निकाल जाहीर केला आहे. अजून महाविद्यालयांकडे निकाल देण्यात आलेला नाही.

निकालाअभावी पदवी व पदव्युत्तरच्या सेमिस्टर परीक्षांचे अर्ज भरण्यात आलेले नव्हते. मात्र, निकाल लावण्यात आल्याने सेमिस्टरचा परीक्षा अर्ज लवकरच भरुन घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने हालचाली सुरु केल्या आहेत. सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्याच्या होम असायमेंट, इंटर्नल टेस्ट घेण्यास सुरवात केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT