पश्चिम महाराष्ट्र

ऊसाला योग्य भाव देण्यास तयार : रुपनर

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : फॅबटेक साखर कारखाना यंदाच्या गाळप हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास कारखानदार,शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या चर्चेतून जो दर निश्‍चित होईल, तो देण्यास तयार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांनी व्यक्त केले.

2018-19 च्या गाळप हंगामाच्या मोळीपूजन उद्योगपती संजय आवताडे, दामाजी शुगरचे संचालक विजय माने, पप्पू काकेकर, अविराज आवताडे, दादा डोंगरे, गणेश गावकरे,परमेश्वर येणपे, आप्पासाहेब ठोंबरे, चिफ इंजिनियर  किशोर फरांदे,चिफ  केमिस्ट चंद्रकांत विभूते, इलेक्ट्रिक मॅनेजर फकिरप्पा यारगन्नी, डिस्टिलरी प्रोडक्शन मॅनेजर कृष्णा शेळके, ऊस विकास अधिकारी रामदास शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी दशरथ रोकडे व उत्तम ढेरे, प्रोजेक्ट इंजिनियर संजय आदाटे, असिस्टंट एच. आर. मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, ई.डी.पी. मनेजर मिनहाज शेख, परचेस मॅनेजर सचिन कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी आबासाहेब वाघमोडे, इन्चार्ज केनयार्ड सुपरवायझर सिद्धेश्वर पाटील, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सिध्दापूर येथील बागायतदार विजयकुमार भरमगोंडे व त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. यावेळी बोलताना अध्यक्ष रुपनर म्हणाले, की फॅबटेक कारखान्याने सात तालुक्यात विश्‍वासार्हता संपादन केल्यामुळे गतवर्षी 5.45 लाखाचे गाळप करण्यात आले. सध्या उजनी भरले असले तरी दुष्काळी परिस्थिती आणि हुमनीच्या पार्दुभावामुळे उत्पन्नात 15 टक्के घट होणार आहे. गाळप  ऊसास एफ,आर,पी,पेक्षा जादा दर दिला असून काही राहिलेल्या ऊस उत्पादक शेतकय्राची रक्कम दिवाळीपुर्वी  देणार आहे.

सध्या डिझेलच्या दरवाढीमुळे ठेकेदारी संघटनेच्या काही समस्या असून त्यासाठी सकात्मक प्रयत्न करताना त्यांच्या मागण्याही चर्चेतून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सूत्रसंचालन अर्जुन मासाळ, तर आभार सचिन मळगे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT