निपाणी : पूर्वी बाळाच्या जन्माची चाहूल लागताच दुपट्टे, टोप्या, लंगोट विणण्याचे काम सुरू होत. मात्र आता जन्मापासूनच रेडिमेड, होजीअरी कपड्यांचा ट्रेंड असल्याने नवजात शिशुसह बालकांच्या कपड्यांची स्वतंत्र दालने शहरात उपलब्ध झाली आहेत. पारंपरिक दुपट्टे, टोप्या, लंगोटे, लहान मुलांचे कपडे आता कालबाह्य होत आहेत. शहरातील विविध दुकानात रेडीमेडची खरेदी होत असल्याने दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
हे पण वाचा - गाजलेल्या नाराजीनाट्यामुळे यांच्या पालकमंत्रीपदाला हुलकावणी
निपाणीत दोन-तीन दशकापूर्वी कापड दुकानांची संख्या मोठी होती. पण टप्प्याटप्प्याने तयार कपडे वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्यांना घरघर लागली. परिणामी व्यवसाय टिकविण्यासाठी अनेकांनी लहान मुलापासून वृद्धापर्यंतच्या रेडीमेड कपड्यांची दुकाने सुरू केली. अलीकडे होजिअरी, तयार कपड्यांचा ट्रेंड आल्याने लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानातही वाढ झाली आहे. शिवाय नफा चांगला असल्याने बहुतांश व्यावसायिक या व्यावसायाकडे वळले आहेत.
एकेकाळी शाळेचा गणवेश आणि सण, उत्सवात एखादा ड्रेस लहान मुलांसाठी खरेदी होत. आता प्रत्येक गोष्टीचे सेलिब्रेशन आणि सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने कपडे खरेदी होते. तसेच विविध ऋतू आणि सणांच्या काळातही विविध प्रकारचे तयार कपडे उपलब्ध आहेत. शून्य ते आठ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कपड्यात वेगवेगळे प्रकार आले आहेत. त्यामध्ये होजिअरी, कॉटन, थर्मलची भर पडली आहे. लंगोट, दुपट्टे, टोप्या हात व पायमोजे, ब्लॅंकेट, नॅपकिन, मच्छरदाणी, विविध प्रकारचे झोपाळे, पाळणे अशा वस्तू उपलब्ध आहेत. व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे नवीन दुकानात रूपांतर करून फॅन्सी आणि पारंपरिक कपड्यांची विक्री सुरू केली आहे. त्यामध्ये होजिअरी तसेच ऋतूनुसार थंड-गरम कपड्यांची मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुकानाच्या दर्शनी कपडे, मुलांच्या आकाराच्या किटमध्ये ठेऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हे पण वाचा - सांगली महापालिकेचा डॉमिनोझ् पिझ्झाला दणका...
ट्रेंडला महत्त्व
शंभर रुपयांपासून हजार रुपयापर्यंत रेडिमेड कपड्यांच्या किमती आहेत. मात्र ग्राहक किमतीपेक्षा आवडीला आणि ट्रेंडला महत्त्व देत आहेत. जन्मापासून प्रत्येक सेलिब्रेशनला खरेदी करण्यासाठी ग्राहक येत आहेत. त्यांच्या आवडीनुसार होजिअरी कपडे विक्रीसाठी ठेवले आहेत.
-वीरकुमार गुंडे, होजिअरी कपड्यांचे विक्रेते, निपाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.