solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

प्राध्यापिकेचा 101 पिंपळ बोन्साय वाटण्याचा संकल्प 

परशुराम कोकणे

सोलापूर- बोधीवृक्ष म्हणून ओळख असलेल्या पिंपळाचे झाड घराघरांत असावे, या विचारातून पर्यावरण अभ्यासिका प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर यांनी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. 101 पिंपळाच्या झाडाचे बोन्साय करून वाटण्याचा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात येत असून, आजवर 27 बोन्सायचे वाटप करण्यात आले आहे. 

प्रा. रोकडे या संगमेश्‍वर महाविद्यालयात कार्यरत आहेत. बोन्सायबाबतचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांनाही बोन्साय कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. घरात आई हिराबाई, मुलगा सौरभ, वहिनी प्रियांका कांबळे यांच्या सहकार्याने प्रा. रोकडे यांनी बोन्साय तयार करायला सुरवात केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी 101 पिंपळाचे बोन्साय करून भेट देण्याचा संकल्प केला. आजवर मित्र, नातेवाईक यांच्या कार्यक्रमांना, वाढदिवसांना 27 बोन्साय भेट दिले आहेत. 

दीड फुटाची उंची..
वनस्पतिशास्त्रात पिंपळाला फायकस रिलिजिओस असे नाव आहे. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते, म्हणून याला अक्षय वृक्षही म्हटले जाते. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. तापमान नियंत्रित ठेवतो. जिथे पिंपळाचे झाड त्या परिसरातील तापमान चार अंशाने कमी असल्याचे समोर आले आहे. 10 ते 15 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या पिंपळाच्या वृक्षाला बोन्साय म्हणजेच मोठ्या झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती केली जात आहे. दीड फुटाचे पिंपळाचे बोन्साय खूपच लक्ष वेधक असून घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते, असे प्रा. रोकडे यांनी सांगितले. 

पिंपळ हे सर्वाधिक ऑक्‍सिजन देणारे झाड आहे. गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखालीच ध्यान साधना केली होती. कुटुंबीयांच्या मदतीने पिंपळाचे बोन्साय बनवून वाटण्याचा संकल्प मी केला होता. आजवर मित्र, नातेवाइकांच्या कार्यक्रमांमध्ये, वाढदिवसाला 27 बोन्साय वाटप केले आहेत. 
- प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT