पश्चिम महाराष्ट्र

ट्रक चोरणारे दोघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा

सांगली - सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) येथून ट्रक चोरून पळालेल्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले. बाराचाकी मोठा ट्रक चोरून हे दोघे फरार झाले होते. अमोल अधिक आपटे (वय २७, रा. हडपसर, मूळ रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) आणि विकास कैलास वंजाळे (वय २३, रा. परिते, ता. माढा) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीनंतर त्यांना बार्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी वाहनचोरीचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन केले आहे. त्यांची गस्त सुरू असताना मिरज विभागात त्यांना संशयितरीत्या ट्रक आढळून आला. 
त्यांना आधीच रेकॉर्डवरील गुन्हेगार या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. पोलिस कर्मचारी अशोक डगळे, अरुण औताडे, वैभव पाटील, कुबेर खोत, सलमान मुलाणी, संकेत कानडे, पवन सदामते, सोहेर कार्तियानी, मुदस्सर पाथरवट गस्ती पथकात होते. मेनन चौकातून सह्याद्री स्टार्चकडे बाराचाकी ट्रक (एमएच ०९ सीआर ७०२९) येत होता. तो अमोल आपटे चालवत होता. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने ट्रक चोरीची कबुली दिली. बार्शी पोलिसांकडे अशी तक्रार दाखल झाल्याची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे खात्री झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. 

अमोल आपटे याच्यावर विश्रामबाग पोलिस आणि कऱ्हाड पोलिसांत १८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विकास वंजाळे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसांत दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. हे कसलेले गुन्हेगार असून त्यांनी अन्य गंभीर गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्याकडे सांगलीत कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैराग (बार्शी) येथील चोरी प्रकरणी त्यांना सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथे आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, अशी खात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT