पश्चिम महाराष्ट्र

'फडणवीसांनी मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळलं'

स्नेहल कदम

बेळगाव : ज्या हिंडलग्यात महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले त्यांचे स्मारक आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस तुम्ही आदरांजली वाहण्यासाठी जाणे आवश्‍यक असताना तुम्ही त्याच ठिकाणी असलेल्या भाजपच्या व्यासपीठावरून मराठी माणसांच्या विरोधात भाषण केले. तुम्ही मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. यामुळे तुम्ही विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली.

कणबर्गी येथे महाराष्ट्र एकिकरण समितीच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, खासदार धैर्यशिल माने, उमेदवार शुभम शेळके आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सभेसाठी बेळगावात आले होते. मराठी माणसांच्या विरोधात ते बेळगावात आले असल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी समिती उमेदवाराच्या प्रचाराच्या व्यासपीठावरून केला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, प्रत्येक वेळेस तुम्ही मराठी माणसांच्या विरोधात भूमिका घेतली आहात ते आम्ही पाहिले आहे. तुम्ही सत्तेत असताना तुमचे सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे एकदाही बेळगावात आले नाहीत. यामुळे मराठी माणसांत तुमच्याबद्दल चिड आहे.

धैर्यशिल माने म्हणाले, मराठी मानसांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. आजची तरुणाई गावागावातून पेटून उठली आहे. फडणवीस यांनी हिंडलग्याचा इतिहास माहिती करून घेणे गरजेचे होते. सीमाभागात तुम्ही का आलात आणि कोणासाठी आला आलात. हे तुम्हाला मराठी जनता विचारते आहे. आम्हाला ही निवडणुक जिंकून हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली द्यायची आहे. मराठी माणूस रडणारा नाही, तो लढणारा आहे. लढवय्या आहे. हे विरोधकांनी लक्षात ठेवायला हवे. असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT