Toilet
Toilet 
पश्चिम महाराष्ट्र

#SaathChal ‘निर्मलवारी’ला चार हजार कुटुंबांची साथ

सकाळवृत्तसेवा

सातारा - जिल्हा परिषदेने यावर्षी प्रथमच संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सोहळा ‘निर्मल वारी’ होण्यासाठी खासगी शौचालये उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखी मार्गावरील सुमारे चार हजारांहून अधिक कुटुंबीयांनी साथ देत, वारकऱ्यांना वैयक्‍तिक शौचालये उपलब्ध करून दिली. त्यामुळे अस्वच्छता कमी होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही जपले गेले.

स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) जिल्हा परिषदेने देशात तिसरा, तर राज्यात ‘ओडीएफ’मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग) चंद्रशेखर जगताप यांनी पुढाकार घेत जिल्ह्यात ‘निर्मलवारी’चा लौकिक पुढे नेण्यासाठी वारकऱ्यांना खासगी शौचालये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. 

प्रशासनाने पालखी मुक्‍कामी, तळ तसेच पालखी मार्गावर फिरत्या सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था केली आहे, तरीही वारकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या व्यवस्थेवर ताण येतो. शिवाय, उघड्यावर शौच केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने वारकऱ्यांना खासगी शौचालये उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्यास पालखी मार्गावरील सुमारे चार हजारांहून अधिक कुटुंबे, व्यावसायिक, कंपन्यांनी प्रतिसाद देत आपली खासगी शौचालये उपलब्ध करून दिली. या शौचालयांवर पांढरा झेंडा लावला होता, तसेच ‘वारकऱ्यांनी आमच्या शौचालयाचा वापर करावा,’ असे फलकही लावले होते. 

पालखी मार्गावरील पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा), चव्हाणवाडी, कोरेगाव, माझेरी, तडवळे, कापडगाव, तरडगाव, काळज, सुरवडी, निंबोरे, वडजल, तडवळे, विडणी, पिंपरद, निंबळक, बरड, राजुरी, घाडगेमळा, काशिदवाडी, ठाकूरकी, फरांदवाडी, उंबुळ (ता. फलटण) या ग्रामपंचायतींसह लोणंद नगरपंचायत, फलटण पालिका क्षेत्रातील कुटुंबीयांनी ही शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध केली, अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातून देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमची शौचालये वारकऱ्यांना उपलब्ध करून दिली. माउलींच्या वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांनी उघड्यावर न जाता शौचालयांचा वापर केल्याने अस्वच्छतेची समस्याही कमी झाली. 
- सागर अडसूळ, तरडगाव (ता. फलटण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT