पश्चिम महाराष्ट्र

गावगाड्यातील रांगडा नेता

सदाभाऊ खोत

वनश्री नानासाहेब महाडिक व माझा संबंध १९८४ सालापासूनचा. बघता बघता ३५ वर्षे निघून गेली. राजकारण व समाजकारणामध्ये बरेचस पाणी पुलाखालून वाहून गेले, पण नानासाहेब हे शेवटपर्यंत राजकारणासाठी कोणत्याही पक्षाचे गुलाम झाले नाहीत. आजअखेर त्यांना कोणत्या पक्षाचे लेबल चिकटलेले समाजाला दिसले  नाही. नानासाहेब हेच समाजाचा पक्ष होते. गावातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये प्रवाहाच्या  विरोधात काम करणाऱ्यांना मदत करणारे हे दानशूर नेते होते. आपल्याकडे आलेल्या लोकांना आदराने व  आनंदाने खाऊ, पिऊ घालणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचा नेता, अशी त्यांची विशेष ओळख होती.

युद्धभूमीवर पराभव डोळ्यांसमोर दिसत असतानाही  विजय होणाऱ्या सेनापती सारखा उभा राहणारा जनसामान्यांचा कणखर नेता ते होते. मनाचा मोठेपणा दाखवून छोट्या-मोठ्या संघटना व लोकांना प्रस्थापितांविरोधात लढण्याची ताकद नानासाहेबांनी दिली. नानासाहेब विरोधकांची मोट नेहमी बांधत असत. ही एकतेची मोट बांधणारा हा गावगड्यातील रांगडा गडी आज आमच्यातून निघून गेला. नानासाहेबांनी तालुक्‍यात कुस्तीला प्रोत्साहन दिले. शैक्षणिक, सामाजिक, सहकार चळवळीला मोठे योगदान दिले. नानासाहेबांचे भाषण समोरच्याला धडकी भरवणारे असायचे. बारीक-सारीक किस्से ते खुमासदारपणे मांडायचे. नानासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते; पण मी मंत्री झाल्यानंतर त्यांनी ते ज्येष्ठत्व बाजूला ठेवून त्यांनी मला जो सन्मान दिला त्यामुळे मला गुदमरल्यासारखे वाटायचे. 

जर कधी नानासाहेबांना मी फोन करून भेटायला येतो,  असे विचारल्यानंतर मीच तुम्हाला थोड्या वेळात  भेटायला येतोय, असे सांगून ते मला भेटायला यायचे. माझ्या घरी आल्यानंतर त्यांना उडदाचे पिटलं व दही धपाटे खायचा मोह व्हायचा. त्यामुळे ज्या ज्या वेळेस माझ्या घरी ते यायचे त्या वेळी उडदाचे पिटलं व दही, धपाटे आवर्जून खायचे.

माझ्या राजकीय जीवनामध्ये नानासाहेब हे सह्याद्रीच्या पहाडासारखे नेहमी उभे असायचे. मी आज माण तालुक्‍याच्या दौऱ्यावर असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे मला समजले. त्यांचे काही खरे नाही कळल्यावर मी हबकून गेलो व लगेच दौरा अर्धवट  सोडून इस्लामपूरची वाट धरली.

हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी नानांना पाहिले; पण चलारे उठा कामाला लागा म्हणणारे नाना आज मला दिसलेच नाहीत..।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT