पश्चिम महाराष्ट्र

सई पेटकरचा स्केटिंगवर लावणीचा ठेका

सकाळवृत्तसेवा

सांगली - स्केटिंगच्या चाकावर तोल सांभाळत गिरकी घेत आणि वेगवेगळ्या अदांवर टाळ्या वसूल करीत नऊ वर्षांची चिमुकली सई शैलेश पेटकर हिने लावणी स्केटिंगचा विश्‍वविक्रम नोंदविला. नेमिनाथनगर येथील क्रीडांगणावर एका तासात ११ लावण्या सादर करून सईने लावणी स्केटिंगमध्ये प्रथमच चार विक्रमांवर नाव कोरले.

लावणी स्केटिंगमध्ये प्रथमच विश्‍वविक्रम नोंदविला जाणार असल्याने नेमिनाथनगर येथे शेकडो प्रेक्षक सायंकाळपासून प्रतीक्षेत होते. नऊ वर्षांची सई लावणी स्केटिंग या नवख्या प्रकारात विक्रम नोंदविणार असल्याने सांगलीकरांना उत्सुकता होती. सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी वंडर बुक, जीनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनोख्या कामगिरीची नोंद करण्यासाठी सईने उपस्थित प्रेक्षक, परीक्षक आणि पाहुण्यांना अभिवादन करीत लावणीवर नृत्यास सुरवात केली. ‘मराठमोळं गाणं हे लाखमोलाचं सोनं’ या लावणीवर उपस्थितांना मुजरा करीत तिने गिरकी घेतली. त्यानंतर स्केटिंगच्या चाकावर तोल सांभाळत तिने उपस्थितांची उत्सुकता वाढवली.

‘ज्वानीच्या आगीची मशाल’, ‘दिसला गं बाई दिसला’, ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘बुगडी माझी सांडली गं,’ ‘आई, मला नेसव शालू नवा’, ‘रेशमाच्या रेघांनी’ अशा लावण्यांवर न थकता तिने अदाकारी सादर केली. प्रत्येक नृत्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करून सईला प्रोत्साहन दिले जात होते. अनेकांनी सईच्या अदा टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे उंचावले होते.

दहा, वीस, तीस असा घड्याळाचा काटा पुढे सरकत असताना शेवटच्या काही मिनिटांत उत्सुकता वाढली होती. शेवटच्या पाचव्या मिनिटात टाळ्यांचा गजर वाढल्यानंतर सईलाही हुरूप आला. तिने आणखी जोमाने नृत्य करीत वाहवा मिळवली. मिनिट काटा सात वाजून दहाव्या मिनिटावर सरकल्यानंतर सईचे वडील शैलेश पेटकर यांनी रिंगवर येऊन तिला खांद्यावर उचलून घेतले. आई प्रतिभा यांनीही तिला मिठीत घेतले. 
महापौर संगीता खोत, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, राहुल आरबोळे स्केटिंग ॲकॅडमीचे प्रा. शिवपुत्र आरबोळे आणि परीक्षक उपस्थित होते. सईने विश्‍वविक्रम पूर्ण केल्याचे परीक्षकांनी जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT