SPCL
SPCL 
पश्चिम महाराष्ट्र

मतदानानंतर चौकार, षटकारांची मेजवानी

सकाळवृत्तसेवा

सातारा - वर्ल्डकप क्रिकेटचे काउंटडाउन केव्हाच सुरू झाले आहे. क्रिकेटप्रेमी त्याची वाट पाहत असतीलच. पण वर्ल्डकप केव्हाही सुरू होवो, त्याआधीच ‘सकाळ’ पुन्हा एकदा घेऊन येत आहे, सकाळ प्रीमिअर क्रिकेट लीग (एसपीसीएल)... तेव्हा तयार राहा, लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर चौकार, षटकारांच्या मेजवानीसाठी...तेही आपल्या खेळाडूंच्या आणि आपल्याच मैदानावर. दरम्यान, क्रीडाप्रेमी असलेल्या जिल्ह्यातील जाणत्या राजकीय नेत्यांनी या स्पर्धेतील संघांशी करार करून स्पर्धेस उल्लेखनीय दर्जा आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने ‘एसपीसीएल’ क्रिकेट स्पर्धा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे.

क्रिकेटपटूंना टर्फ विकेटवर त्यांचे कौशल्य सिद्ध करता यावे, यासाठी ‘सकाळ’ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. आयपीएल, एमपीएलच्या धर्तीवर गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यामध्ये ‘सकाळ प्रीमिअर क्रिकेट लीग’चे आयोजन केले जात आहे. क्रिकेटला व्यावसायिक चेहरा देणारी आणि दिवस-रात्र खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या केवळ सातारकर क्रिकेटप्रेमीच नव्हे तर राज्यभरातील खेळाडू प्रेमात पडले आहेत. ही स्पर्धा सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या मोलाच्या सहकार्याने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर होईल. रंगीत गणवेश, व्हाइट बॉल, प्रकाशझोतात खेळविण्यात येणारे सामने असा थरार क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने होईल. त्यापूर्वी खेळाडूंची माहिती संघ मालक आणि त्यांच्या प्रशिक्षकांना देता यावी. यासाठी इच्छुकांनी नोंदणी अर्ज भरणे आवश्‍यक आहे. प्राप्त अर्जांतून ‘सकाळ प्रीमिअर क्रिकेट लीग’ची समिती गुणवत्तेनुसार अथवा निवड चाचणीच्या माध्यमातून खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करेल.  

सातारा, कऱ्हाड व फलटणमध्ये नोंदणी 
‘सकाळ प्रीमिअर क्रिकेट लीग’ स्पर्धेसाठी यापूर्वी सुमारे १६५ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे आणि ज्यांचे वय १६ वर्षे पूर्ण आहे, अशांनी नोंदणी शुल्क २०० रुपये भरून अर्ज करावा. अर्जासोबत दोन छायाचित्रे आवश्‍यक आहेत. खेळाडू हा सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. 

नोंदणीकृत नसल्यास त्याची नोंदणी सशुल्क ‘सकाळ’च्या माध्यमातून केली जाईल. इच्छुक खेळाडूंनी ‘सकाळ’ कार्यालय, रजतसागर कॉम्प्लेक्‍स, पोवई नाका, सातारा, सकाळ विभागीय कार्यालय, श्री चेंबर्स, गुरुवार पेठ, कऱ्हाड आणि सकाळ विभागीय कार्यालय, लक्ष्मीनगर, आय. डी. बी. आय. बॅंकेजवळ, फलटण येथे खेळाडूंसाठी अर्ज उपलब्ध आहेत.

संघ करारासाठी संपर्क साधावा...
‘सकाळ’ च्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात विद्यार्थी खेळाडूंसाठी ‘सकाळ स्कूल क्रिकेट लीग’ तसेच युवा पिढीला व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव यावा यासाठी ‘एसपीसीएल’ अशा दोन क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांतून खेळाडू राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठ स्तरावर तसेच रणजीपर्यंत पोचण्यापर्यंत यशस्वी ठरल्याची उदाहरणे आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्पर्धेच्या संघ करारासाठी उद्योजक, पोलिटिशियन, शैक्षणिक, सहकारी, क्रीडा संस्था सरसावल्या आहेत. अधिक माहिती व संघ कराराच्या प्रक्रियेसाठी ‘सकाळ’चे शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर (९८८११३३०७३), सहायक व्यवस्थापक राहुल पवार (९९२२९१३३४५) यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT