bjpshivsena
bjpshivsena 
पश्चिम महाराष्ट्र

भाजप-सेना युतीसाठी संभाजी पवार प्रयत्नशील 

सकाळवृत्तसेवा

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार संभाजी पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना त्याबाबत सल्ला दिल्याची माहिती नगरसेवक गौतम पवार यांनी दिली. पत्रकाराशी बोलताना त्यांनी अशी युती झाली तरच महापालिकेत प्रथमच युतीला निर्भेळ सत्ता मिळू शकते असे मतही नोंदवले. 

पवार म्हणाले, "स्थानिक पातळीवर भाजपमधील काही मंडळींशी आमचे मतभेद असले तरी वरीष्ठ पातळीवर आमचे आजही संबंध कायम आहेत. त्या संबंधातूनच आम्ही भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना याबाबत कळवले आहे. माजी आमदार पवार यांनी शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. सेनेत मातोश्रीतून आदेश आला की त्याचे खाली पालन होते. पृथ्वीराज पवार यांनीही शिवेसना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

राज्यात आजही केंद्र आणि राज्यात भाजप-सेना सत्तेत आहे. त्यामुळे भाजपसोबत युती हा काही नवा विषय नाही. सहा महिन्यांपूर्वी आम्ही आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी आणि नेते मकरंद देशपांडे यांच्याशीही चर्चा केली आहे. सध्या कधी नव्हे ती युतीला चांगली संधी आहे असे सर्वांचेच मत आहे. त्यामुळे युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही एकत्र येऊन आघाडी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि युतीबाबतचा अंतिम निर्णय उध्दव ठाकरे घेतील. शिवसेनेशिवाय सत्ता येऊ शकत नाही हे भाजपच्या जिल्हा परिषद निवडणुकीत लक्षात आले आहेत. नंतर एकत्र येण्याऐवजी आधीच युती असावी हे त्यांना नक्की पटेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT