मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळव्यात उत्स्फूर्त स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाळव्यात उत्स्फूर्त स्वागत 
पश्चिम महाराष्ट्र

क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी सोळा कोटी - फडणवीस 

सकाळवृत्तसेवा

वाळवा - पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकासाठी सोळा कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केला. पहिल्या टप्प्यासाठी शासनाने चार कोटी दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी सोळा कोटीची घोषणा केल्यामुळे उद्योग समुह व अण्णांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जनतेने स्वागत केले. 

हुतात्मा साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प व वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्ह्यातील विविध खासदार, आमदार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "" देश स्वतंत्र होण्यापुर्वी प्रतिसरकारच्या अधिपत्याखालील दीडशे गावे आधीच स्वतंत्र झाली होती. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने सर्वप्रथम स्वातंत्र्याचा झेंडा या परिसरात फडकावला. देशाच्या स्वातंत्र्याचे बीजारोपण या परिसरात झाले. या परिसरात येवून क्रांतिवीर नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा किसन अहिर यांना अभिवादन करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. अण्णांच्या समाधीवर नतमस्तक होताना मिळालेली प्रेरणा मला राज्याच्या विकासासाठी साह्यभूत ठरेल. क्रांतिवीर नागनाथअण्णांचे स्मारक उभारणीचे काम सुरु आहे. राज्य शासन त्यासाठी निधी देत आहे. स्मारकाचा 4 कोटीचा पहिला टप्पा पूर्णत्वावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकार सोळा कोटी रुपये देईल. दुसऱ्या टप्प्यात या स्मारकात सहकाराला दिशा देणारे सहकार प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT