पश्चिम महाराष्ट्र

गळवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी एकास अटक

बलराज पवार

सांगली - गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतीक्षा दादासाहेब गळवे (वय 8) या मुलीच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

विधीमंडळात गाजलेल्या या संवेदनशील घटनेचा तपास अतिशय संयमाने करत तब्बल 180 जणांच्या चौकशीतून आरोपीपर्यंत पोचण्यात पोलिसांना यश आले. मात्र या खुनाची उकल करताना गेल्या वर्षी झालेल्या एका बाल लैंगिक अत्याचाराचा प्रकारही उघडकीस आला असून दोन्हीतील आरोपी एकच आहे. त्या प्रकरणीही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अधीक्षक शर्मा म्हणाले, सात महिन्यांपुर्वी जानेवारीत आटपाडीपासूनच जवळच असलेल्या गळवेवाडीतील प्रतीक्षा गळवे या मुलीचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या जगमाई नावाच्या एका पडक्‍या विहीरीत सापडला होता. तपासानंतर
तिच्यावर अत्याचार करुन नंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी अनेक प्रयत्न सुरु होते. मात्र आरोपी स्पष्ट होत नव्हता.'

ते म्हणाले, "आटपाडी पोलिसांसह, स्थानिक गुन्हे अन्वेषण, सायबर क्राईम हे सर्व विभाग या घटनेच्या तपासात सहकार्य करत होते. गेल्या सहा महिन्यात तब्बल 180 जणांकडे चौकशी केली. त्यातील दहा संशयितांची पॉलिग्राफ चाचणी केली, तीनजणांचे ब्रेनमॅपिंग केले तर दोघांची नार्को चाचणी करण्यात आली. तसेच अशा घटना यापुर्वी कधी परिसरात घडल्या आहेत काय? याचीही चौकशी करण्यात आली. त्यातून एकाने त्याच परिसरात इतर दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली. मात्र त्याची तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्याच संशयिताकडे कसून तपास केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.'

घटनेच्या दिवशी प्रतीक्षा घरासमोर खेळत असताना संशयिताने तिला आमिष दाखवून बोलवून घेतले. संशयित ओळखीचा असल्याने प्रतीक्षा त्याच्याकडे गेली. मात्र नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन नंतर तिच्याच लेगींजने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पडक्‍या विहीरीत टाकला, अशी
माहिती पोलिसांनी दिली. संशयितावर इतर दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणीही आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडीचे पोलिस निरीक्षक ए. एस. कोळी करत आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, विटा उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT