पश्चिम महाराष्ट्र

बल्बची खरेदी सहा हजार रुपयांना

सकाळवृत्तसेवा

सांगली -  बहुचर्चित ‘एलईडी’ बल्ब घोटाळा नागराळे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतही घडल्याचा प्रकार पुढे आला. बल्ब खरेदी करण्यात कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीलाही नागराळेने मागे टाकून सर्वाधिक पाच हजार ९९५ रुपयांना ‘एलईडी’ बल्ब खरेदी केले आहेत. माहिती अधिकारातील माहितीत हा घोटाळा उघडकीस आला असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. 

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गावकारभाऱ्यांनी ‘एलईडी’ बल्ब खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. कुंडलापूर ग्रामपंचायतीत एक हजार ८०० ते दोन हजार रुपयांचा बल्ब पाच हजार ४०० रुपयांना खरेदी केल्याचा प्रकार घडला. जागरूक सदस्य आणि ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर ‘सकाळ’ने जिल्ह्यातील घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे ‘सीईओ’ राऊत यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

घोटाळ्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत तसेच मिरज पंचायतीच्या मासिक सभेतही उमटले. कुंडलापूर येथील बल्ब खरेदीला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता नसल्याने संपूर्ण रक्कम वसुलीची नोटीस ग्रामसेवक, उपसरपंच आणि संबंधितांना काढली आहे. तसेच, इतर ग्रामपंचायतींनी केलेल्या बल्ब खरेदीची चौकशीही सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. यापैकी अनेक ग्रामपंचायतींतही हा घोटाळा झाला आहे. तेथे ‘एलईडी’ बल्ब घोटाळा सध्या चर्चेत आहे.

नागराळे (ता. पलूस) गावातही बल्ब खरेदीत घोटाळा झाल्याचा प्रकार माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत उघड झाला आहे. गावात २४ एलईडी बल्ब बसविले आहेत. त्यासाठी एक लाख ४३ हजार ९०० रुपये खर्च दाखविले आहेत. नामांकित कंपनीच्या बल्बची किंमत एक हजार ८०० ते दोन हजार रुपये असताना नागराळेने तब्बल पाच हजार ९९५ रुपयांना एक बल्ब खरेदी केल्याचे दाखविले आहे. बल्बची सर्वाधिक किंमत दाखविण्यात नागराळेतील कारभाऱ्यांनी कुंडलापूरलाही मागे टाकल्याचे दिसून येते.

अन्य कामांचीही मागवली माहिती
नागराळे येथील महादेव पाटील यांनी माहिती अधिकारात ‘एलईडी’ बल्बबरोबर अन्य कामाची माहिती मागवली होती. माहिती मिळाल्यानंतर श्री. पाटील आणि संपतराव पाटील, माजी सरपंच मोहन पाटील आदींनी ‘सीईओ’ राऊत यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली. बल्बसह दलित वस्तीतील कूपनलिका, मुरमीकरण, नागराळे ते जुना कुंडल रस्ता या कामात भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT