पश्चिम महाराष्ट्र

कोथळे मृत्युकांड प्रकरणी ‘मिनिट टू मिनिट’ रेकॉर्डवर - अधीक्षक पाठक

सकाळवृत्तसेवा

सांगली - पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळेचा मृत्यू ते आंबोलीत मृतदेह जाळण्यापर्यंतच्या घटनाक्रमात कुणाचा कसा सहभाग होता, याचे क्षणाक्षणाचे बारकावे नोंदवले जात आहेत. आरोपींविरुद्ध हेच भक्कम पुरावे म्हणून वापरले जातील. त्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडीचे) अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता बळावली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सीआयडीच्या तपासालाही गती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने कोथळेच्या पलायनाची खोटी फिर्याद दिली होती. त्याचा स्वतंत्रपणे तपास केला जात असून तो आता सीआयडीमार्फत होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाठक यांनी या प्रकरणात अनेकांची उलटतपासणी घेतली आहे. 

या घटनाक्रमात एकेक नवीन चेहरे समोर येत आहेत. ही साखळी जुळवून त्याचा घटनाक्रम निश्‍चित करण्याचे आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यासाठी प्रत्येक पुराव्याची आणि सहभागी आरोपांची स्वतंत्रपणे मांडणी करून पुरावे जुळवले जात आहेत. संबंधित व्यक्ती या गुन्ह्यात कशी व कुठल्या टप्प्यावर सहभागी झाली, त्याची भूमिका काय होती, याची रेघ अन्‌ रेघ सीआयडी जमा करत आहे. घटनेच्या रात्रीच्या कुणी कुणाला फोन केले, याचा सविस्तर अहवाल हाती आहे. संशयितांशी संपर्क केलेल्यांचे जवाब नोंदविले जात आहेत, असेही श्री. पाठक यांनी स्पष्ट केले. 

दोघे रडारवर
अनिकेत कोथळेसोबत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अमोल भंडारे याला घटनेच्या दिवशी आयर्विन पुलावर घेऊन दोन व्यक्ती थांबल्या होत्या. कोथळेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत त्या दोघांचाही सहभाग होता, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. ते दोघे कोण होते, यावरून लवकरच पडदा उठणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहे. पाठक यांनी मात्र यावर बोलणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT