पश्चिम महाराष्ट्र

राज्यात दोन कोटी एलईडी बल्बमुळे वर्षाला 1123 कोटींची बचत 

सकाळवृत्तसेवा

सांगली - ऊर्जा बचतीसाठी एलईडी बल्ब हा एक पर्याय आहे, केंद्र शासनाने यासाठी धोरण आखले आहे. आजपर्यंत राज्यात 2 कोटींहून अधिक बल्बचे वितरण करण्यात आले आहे. एल ई डी बल्बमुळे दरवर्षी राज्याची 28 लाख मेगावॉट वीज बचत आणि एक हजार 123 कोटी रुपयांची बचत होणार आहे. सांगली जिल्ह्यात 1 लाख 43 हजार बल्बचे वितरण झाले आहे. बल्ब वापराबाबत अद्यापही जागृती, प्रोत्साहनाची गरज आहे. 

एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण केंद्र उघडण्यात आली आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 21 हजार 382 इतक्‍या एल ई डी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. तर 92 हजार 769 एल ई डी ट्यूब लाईटचे वितरणही झाले आहे. 

एलईडी बल्ब वितरणात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. एकूण 34 लाख 18 हजार बल्बचे वितरण केले आहे. पुणे शहरी भागात 29 लाख 74 हजार 72 तर पुणे ग्रामीण भागात 9 लाख 30 हजार 150 इतक्‍या बल्बचे वितरण झाले आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांत 71 लाख 77 हजार 803 एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 लाख 15 हजार तर अकोला जिल्ह्यात 9 लाख 59 हजार बल्ब वितरित झाले आहेत. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये गोंदिया- 2 लाख 19 हजार 930, भंडारा- 1 लाख 84 हजार, वर्धा- 4 लाख 82 हजार, गडचिरोली- 2 लाख 98 हजार 994, चंद्रपूर- 4 लाख 56 हजार 414, अमरावती- 8 लाख 75 हजार 300, यवतमाळ- 5 लाख 64 हजार 599, वाशीम- 8 लाख 62 हजार व बुलडाणा जिल्ह्यात- 8 लाख 59 हजार 752 इतक्‍या बल्बचे वितरण झाले आहे. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 21 लाख 8 हजार 942 एल ई डी बल्ब वितरित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात 8 लाख 6 हजार 933 तर नांदेड जिल्ह्यात 3 लाख 84 हजार 542 इतके बल्ब वितरित झाले आहेत. उस्मानाबाद- 1 लाख 9 हजार 533, जालना- 2 लाख 60 हजार 460, लातूर- 1 लाख 90 हजार 565, परभणी- 1 लाख 71 हजार 531, हिंगोली- 99 हजार 671 तर बीड जिल्ह्यात 85 हजार 707 बल्ब वितरित झाले आहेत. 

मुंबईत 9 लाख 54 हजार 684 इतके बल्ब वितरित झाले आहेत, राज्यातील इतर जिल्ह्यात एलईडी बल्बचे वितरण असे- कोल्हापूर- 12 लाख 53 हजार, सांगली- 1 लाख 43 हजार, सोलापूर- 8 लाख 21 हजार, सिंधुदुर्ग- 3 लाख 71 हजार, रत्नागिरी- 4 लाख 61 हजार, सातारा- 3 लाख 60 हजार, नाशिक- 5 लाख 70 हजार, जळगाव- 7 लाख 67 हजार, अहमदनगर- 3 लाख 87 हजार, धुळे- 1 लाख 35 हजार, ठाणे- 4 लाख 70 हजार, कल्याण- 77 हजार, भिवंडी- 1 लाख 86 हजार, वाशी- 4 लाख 21 हजार बल्बचे वितरण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT