पश्चिम महाराष्ट्र

वाळूतस्करांचा कोतवालावर जीवघेणा हल्ला 

सकाळवृत्तसेवा

मलवडी/सातारा - वाळूचोरांना पकडण्यास गेलेल्या कोतवालावर जीवघेणा हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल रात्री माण तालुक्‍यात घडला. कृष्णदेव दत्तात्रय गुजर (वय 34, रा. राणंद) असे या कोतवालाचे नाव असून, त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

विनोद वाघमारे, अमर कोळी, ओंकार कुलकर्णी, सागर सुळे, नितीन मेटकर व एक अनोळखी व्यक्ती अशा सहा जणांनी मारहाण केल्याचा जबाब जखमी गुजर यांनी म्हसवड पोलिसांकडे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिला आहे. या लोकांनी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असेही जबाबात म्हटले आहे. 

सलग दोन दिवस माण-खटावमधील महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे भीतीचे तसेच संतापाचे वातावरण आहे. 

माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांच्याकडे काल दिवसभर म्हसवड, देवापूर, काळचौंडी भागातून अवैध वाळूचोरीसंबंधी तक्रारी येत होत्या. त्यानुसार काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी विविध पथके तयार करून गस्तीसाठी पाठवली होती. विरकरवाडीतील चौकात कोतवाल कृष्णदेव गुजर हे बोलेरो घेऊन गस्तीसाठी थांबले होते. दुसरे पथक त्यांच्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते. 

मध्यरात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास वाळूने भरलेला डंपर पानवण बाजूने काळचौंडीच्या दिशेने जाताना गुजर यांना दिसला. त्यांनी तत्काळ डंपरचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने डंपर वेगात पळविण्यास सुरवात केली. पण, काळचौंडी येथील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने वाळूने भरलेला डंपर पलटी झाला. डंपरपुढे मोटार उभी करून गुजर खाली उतरले असताना पाठोपाठ आलेल्या एका मोटारीतून पाच जण उतरले. त्यांनी गुजर यांच्या गाडीला गाडी आडवी मारली. त्यातील वाळू तस्करांनी गुजर यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण करण्यास सुरवात केली. त्याच दरम्यान वाळू तस्करांचे अजून काही संबंधित त्याठिकाणी आले व तेही गुजर यांना मारू लागले. या लोकांनी लोखंडी टॉमी, दांडके, लोखंडी गज तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी गुजर यांच्या पाठीत, डोक्‍यात तसेच पायावर बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी गुजर यांच्या खिशातील चार हजार रुपये व कागदपत्रे काढून घेतली. त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. 

पुन्हा गुजर यांना जबरदस्तीने बोलेरोत बसवून त्यांना झरे (ता. आटपाडी) येथे गाडी घेऊन येण्यास भाग पाडले. झरे गावच्या बस स्थानकावर पुन्हा गुजर यांना या वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली. वाळूच्या बाबत म्हसवड हद्दीत आलास व झालेल्या प्रकाराची तक्रार पोलिसांत दिलीस तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही या तस्करांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते गोपीचंद पडळकर हे तिथून जात होते. काही लोकांचा जमाव एकास मारहाण करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाळू तस्करांच्या तावडीतून गुजर यांना सोडविले. तिथून त्यांनी गुजर यांना म्हसवड पोलिस ठाण्यात आणले. गंभीर जखमी अवस्थेतील गुजर यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. वाळूचा डंपर जेसीबीच्या साह्याने उचलून नेण्याच्या तयारीत असतानाच म्हसवड पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. गुजर ज्या वाहनातून गेले, ती बोलेरो गाडी अद्याप मिळालेली नाही. 

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांनी तत्काळ हालचाली केल्या. गुजर यांची तब्येत स्थिर असून सातारा येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. 

ड्रोनच्या साह्याने चित्रीकरणाची गरज 
पळशी, म्हसवड, देवापूर या परिसरातील नदी व ओढ्यांच्या पात्रांचे ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करण्याची आवश्‍यकता आहे. असे केल्यास वाळूचोरीची संपूर्ण भीषण परिस्थिती लक्षात येऊ शकते, तसेच दिवसाढवळ्या वाळूचोरी करून प्रशासनाला गुंगारा देणारे वाळू चोर सापडू शकतात, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT