पश्चिम महाराष्ट्र

नऊ हजार कुटुंबांना हवा आसरा

सकाळवृत्तसेवा

सातारा - ‘सर्वांसाठी घर’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग कसोशीने प्रयत्न करतोय. केंद्र शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १५ हजार २०५ कुटुंबे घरकुलांसाठी लाभार्थी ठरली होती. त्यातील सहा हजार २४९ कुटुंबांना दोन वर्षांत घरकुलांचा लाभ मिळाला आहे. अद्यापही आठ हजार ९५६ कुटुंबांना आसरा द्यायचा आहे.

‘पंतप्रधान आवास योजना’, ‘शबरी’, ‘रमाई घरकुल’ आदी योजनांतून केंद्र व राज्य शासनामार्फत बेघरांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कुटुंबांचा ‘पंतप्रधान आवास योजने’तून सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये केंद्र शासनाकडून २६ हजार ९७२ कुटुंबांची यादी देण्यात आली होती. त्यानंतर या यादीची छाननी झाली असता त्यातून जिल्ह्यात ११ हजार ७६७ जण अपात्र ठरले, तर १५ हजार २०५ लाभार्थी ठरले. या योजनेतून २०१६-१७ मध्ये सातारा जिल्ह्यास पाच हजार १२९ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील दोन हजार ६७६ घरकुले बांधून पूर्ण झाली असून, उर्वरितांचे घरकुलांचे काम सुरू आहे. ‘रमाई योजने’त एक हजार ९५२ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यातील एक हजार ५९ घरकुले पूर्ण झाली, तर ‘शबरी योजने’तील ६० पैकी ५५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

‘पंतप्रधान आवास योजने’तून २०१७-१८ मध्ये एक हजार १२० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यातील ९८९ घरकुलांना मान्यता दिली आहे. ‘रमाई’मध्ये ३००, तर ‘शबरी’मध्ये २२ घरकुलांचे उद्दिष्ट असून, त्यांनाही लवकरच मान्यता देणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) विभागातून सांगण्यात आले.

डिसेंबरमध्ये फेर सर्वेक्षण होणार
बेघरांसाठी सर्वेक्षण झाले असले तरी त्यात नव्याने लाभार्थी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायती स्तरावर फेर सर्वेक्षण होऊन लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येतील. त्यानंतर ही यादी शासनाकडे सादर केली जाईल, अशीही माहिती ‘डीआरडीए’मधून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT