shivsparsha trackers
shivsparsha trackers  
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडच्या शिवस्पर्शकडून राजगडावर ध्वजवंदन

सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा): येथील आझाद चौकातील शिवस्पर्श ट्रेकर्सच्या सदस्यांनी राजगड ते तोरणा असा खडतर ट्रॅक पूर्ण केला. 26 जानेवारीला ग्रुपच्या राजगडावर तिरंगा फडकावून प्रजासत्ताक सदस्यांनी साजरा करत तिरंग्याला सलामी दिली. ट्रेकर्सच्या अनोख्या उप्रकमामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. स्वराज्याच्या राजधानी असलेल्या राजगडावर तिरांगा फडकावून शिवस्पर्श ट्रेकर्सच्या सदस्यांनी देशभक्ती, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबतची भक्ती जागृत करत तिरंगी आनंदाचा सोहळा साजरा केला.

शिवस्पर्शच्या अकरा सदस्यांनी राजगड ते तोरणा किल्ल्यांची अवघड श्रेणीतील ट्रेकींगची मोहिम आखली 25 ते 29 जानेवारीपर्यंत ती मोहिम त्यांनी फत्ते करताना राजगडावर दोन दिवसांचा मुक्काम केला. 25 जानेवारीला सायंकाळी येथून शिवस्पर्शचे सदस्य रात्री उशिरा बाहेर पडले. माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, शिवस्पर्शचे अध्यक्ष महेश काटवटे, नितीन मगरे, अमोल भोकरे, चेतन मुळे, संदीप वंजारी, सुरेश वंजारी, सचिन उर्फ दादा जाधव, सागर मुळे, धर्मेंद्र माने व सचिन शिंदे यांचा त्यात समावेश होता. सायंकाळी सातला निघलेले ट्रेकर्स रात्री अकराच्या सुमारास पाली येथील वाघजाई येथे पोचले. रात्री साडेबारानंतर त्यांनी राजगड चढण्यास सुरूवात केली. पालीच्या दरवाजातून त्यांनी किल्लाकडे कुच केले. रात्रीचा किर्रर अंधार होता. चांदण्याच्या उजेड होता मात्र गर्द झाडीमुळे तो फारसा पडत नव्हता. त्यामुळे मोबाईलच्या बॅटऱ्यांच्या आधार घेवून त्यांना गड सर करावा लागणार होता. पालीतून निघालेल्य़ा सदस्यांनी अवघ्या पावणे दोन तासात किल्ला सर केला. किल्ल्यावरील सदरात ते पोचले. तेथून बाले किल्ला अजूनही दूरच होता. पावणे दोनच्या सुमारास पोचलेल्या सदस्यांनी सदरातच मुक्काम केला. त्यांनी सोबत पाच टेन्ट नेले होते. ते टाकून त्यात मुक्काम केला. घरून नेलेली शिदोरी तेथे खाल्ली. सकाळी उठून त्यांना बाले किल्ला सर करायचा होता. त्याशिवाय किल्ल्यावर ध्वजवंदन करण्याच्या अनोख्या आनंदाचेही त्यांना साक्षीदार व्हायचे होते. सकाळी लवकर उठून सदस्यांनी तयारी केली. मात्र तोपर्यंत तेथील किल्लेदारांसह कोतवाल, तलाठी तेथे आले होते.

बाले किल्ल्यावर ध्वज फडकवणार होता. त्या आनंदात सहभागी होण्याचीही संधी सदस्यांना मिळाली होती. त्यामुळे तिरंग्याला सलाम करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या गणतंत्र दिवसाचा तिरंगा आनंद प्रत्येक सदस्याच्या मनात भरून आला होता. तिरंग्याला सलामी देताना त्यांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या राजधानीत केलेला देशभक्तीचा उत्सव मनाला भावून गेला. चाळीस किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या राजगड त्यांनी प्रजासत्ताक दिना दिवशी पाहिला. एका दिवसात राजगड पाहून संपणार नव्हता. त्यामुळे त्यांनी सुवेळा माची, पद्मावती माची कुच केली. दोन्ही माची बाले किल्ल्यापासून दरीच्या रस्त्याने किमान तीन किलोमीटर अंतरावर आहेत. सुवेळा व पद्मावती माचीतील अंतर किमान सात किलोमीटरचे आहे. त्या रात्रीचा मुक्कामही त्यांनी टेन्ट मारून किल्ल्यावरच केला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी स्वतः बनवलेली न्याहरी करून शिवस्पर्शच्या सदस्यांनी संजीवनी माचीकडे कुच केली. ती माचीही बाले किल्ल्यापासून किमान चार किलोमीटरवर आहे. संजीवनी माची पाहून सदस्य़ांनी दऱ्या खोऱ्यातील रस्त्याने तोरणागडाकडे कुच केली. त्यावेळी राजगडापासून सुमारे चौदा किलिमोटवरील तोरणा किल्ल्याकडे कुच करताना दऱ्या खोऱ्यांच्या अवघड श्रेणीतील रस्त्याने प्रवास करावा लागला. त्यावेळी प्रत्येक सदस्याकडे किमान दोन पाण्याच्या बाटल्या सक्तीने ठेवाव्या लागल्या. कारण वाटेत कोठेच पाणी उपलब्ध होणार नव्हते. निम्मी वाट पार करून गेले. तोरणा व राजगड अशा दोन्ही गडाच्या मधोमध धनगरवाडा गाव आहे. त्या गावात खाली सदस्या उतरले. गावही पाहून तेथून पाणी भरून पुन्हा तोरणेकडे कुच केली. अत्यंत खडतर व अवघड मार्गावरून जाताना सदस्यांचे टिमवर्क चांगले झाले. जरा जरी तोल गेला तरी तो निष्काळजीपणा न परवडणारा होता. त्यामुळे प्रत्येकाने घेतलेली खबरदारी महत्वाची ठरली. तोरणेच्या बुधला माचीकडे प्रवेश करताना दऱ्यातील शिड्या व रोपाला धरून खडतर प्रवास करत सदस्य तेथे पोचले. ती पाहून ते थेट किल्ल्यावर गेले. तेथे त्या दिवशीचा मुक्काम झाला.

दसुऱ्या दिवशी त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधलेले प्रवेशद्वार, तोरणजाई देवी, कोकण दरवाजा, झुंजार माची पाहिली.  मुळ किल्ल्यापासून किमान तीन किलेमीटरवर झुंजार माचीचा कडा उतरून त्यांनी तीही सर केली. तेथून पुन्हा दुपारी दोन वाजता सारे साहित्य अटपून तोरणा उतरण्यास सुरूवात केली. किमान दोन तासात किल्ला उतरल्यानंतर शिवस्पर्श ट्रेकर्सच्या सदस्यांची राजगड ते तोरणा अशा अवघड श्रेणीतील किलल्यांची मोहिम फत्ते झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT