पश्चिम महाराष्ट्र

खड्डेमुक्‍तीने रस्ते बनले ‘राज’मार्ग

विशाल पाटील

सातारा - लांबलेला पावसाळा, कामकाजातील त्रुटींमुळे जिल्हाभरातील रस्ते अक्षरक्ष: खड्ड्यांत गेल्याची स्थिती होती. राज्यभर हा मुद्दा राजकीय ठरल्याने त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍त महाराष्ट्र अभियान राबविले. त्याला १५ डिसेंबरची ‘डेडलाइन’ दिल्याने हे काम अंतिम टप्प्यात आले असून, जिल्ह्यातील दोन हजार २०४ किलोमीटर लांबीच्या राज्य, जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. 

पावसाळा संपताच राज्यभर खड्ड्यांनी राजकीय रण तापले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विइथ खड्डा मोहीम (#Selfiewithpotholes) राबविली. त्यावर उत्तर देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍त महाराष्ट्र अभियान (#PotholeMuktMaha) राबविले. त्यांनी १५ डिसेंबरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते खड्डेमुक्‍त करण्याचे उद्दिष्ट दिले. जिल्ह्यात एक हजार २३१ किलोमीटरच्या राज्य मार्गापैकी ९२८ किलोमीटरवर खड्डे पडले होते. आजवर ते बुजविण्यात आले आहेत. जिल्ह्यात दोन हजार १०७ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग असून, त्यापैकी एक हजार ५८२ किलोमीटरवर खड्डे पडले होते. त्यातील एक हजार २७६ किलोमीटरवरील खड्डे बुजविले होते. १५ टक्‍के काम उर्वरित राहिले असून, तेही १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी धांदल सुरू होती. मध्यंतरी ओखी वादळामुळे आलेल्या पावसामुळे हे काम रखडल्याचे बांधकाम विभागातून सांगण्यात आले. 

डांबरात काळेबेरे?
खड्डे बुजविण्यासाठी काही कंपन्यांकडून डांबर खरेदी केले जाते. मात्र, त्या डांबरातील चिकटपणा कमी होत असल्याचे ठेकेदार सांगत आहे. कदाचित डांबरामध्येही भेसळ होते की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. हे थांबविण्यासाठी डांबराची गुणवत्ता तपासावी, तसेच डांबराच्या टॅंकरला जीपीएस यंत्रणा बसवावी, अशीही मागणी होत आहे. 

वाढली धडधड
खड्डे बुजविताना साधारण रस्त्यापासून अर्धा इंच उंचीवर खड्डा बुजविला जातो. वजनाची वाहने गेल्यानंतर भरलेला खड्डा पुन्हा दबला जातो, असे बांधकाम विभागातून सांगण्यात आले. बहुतांश खड्डे याच पध्दतीने भरले गेल्याने खड्डे गेले पण वाहनांची धडधड वाढली अशी स्थिती बनली आहे.

प्लॅस्टिक कोटिंग
संबंधित ठेकेदारांना दोन वर्षांसाठी खड्डे बुजविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ते खड्डे पुन्हा पुन्हा उखडू नयेत, यासाठी त्यामध्ये वेस्ट प्लॅस्टिकचा वापर करणे बंधनकारक केले आहे. खड्डे भरल्यानंतर वरील ग्रेडला प्लॅस्टिकचे कोटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे खड्डे पुन्हा उखडण्याची शक्‍यता कमी होऊ शकते. प्लॅस्टिकच्या वापराने आठ टक्‍के डांबर कमी लागत आहे. 

निधीचे येणे-जाणे
जिल्ह्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३०:५४ या लेखाशीर्षाखाली रस्ता परीक्षण व दुरुस्तीच्या १३५ कामांसाठी ४५ कोटी ५० लाखांची अंदाजपत्रकीय मागणी केली होती. त्यापैकी ११ कोटी मिळाले. ५०:५४ लेखाशीर्षखाली मार्ग व पूल दुरुस्तीच्या २९ कामांसाठी ७४ कोटी ५० लाखाची अंदाजपत्रकीय मागणी केली आहे. परंतु, त्यात अर्थसंकल्पात २५ टक्‍के निधीची तरतूद केली असली तरी तो निधी अद्याप प्राप्त झाला नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT