पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंसह 100 समर्थकांवर गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

सातारा - आनेवाडी टोलनाका ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जमाव व शस्त्रबंदीचा आदेश डावलून येथील शासकीय विश्रामगृहावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या 100 समर्थकांवर शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. 

माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अमोल मोहिते (रा. माची पेठ), अतुल चव्हाण, विनोद ऊर्फ बाळू खंदारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, विक्रम पवार, हरी साळुंखे (गुरुवार पेठ), फिरोज हबीबखान पठाण, बाळासाहेब महामुलकर, अमित महिपाल, रवी पवार (सर्व रा. फॉरेस्ट कॉलनी व गोडोली), माजी नगरसेवक प्रवीण पाटील (रा. सोमवार पेठ), पंकज पवार (रा. कोडोली), आमदारांचे स्वीय सहायक गणेश भोसले, बाळू दणाणे, राहुल सोनावणे, अनिकेत तपासे, सनी शिंदे, अक्षय कांबळे, आकाश नेटके, कैलास मायणे, संग्राम दणाणे, अजिंक्‍य दणाणे, प्रवीण ऊर्फ गोट्या तपासे (सर्व रा. मल्हार पेठ), चेतन सोळंकी, बबलू सोळंकी (रा. सदरबझार), मुक्तार पालकर (गुरुवार परज), अक्षय अजित मोहिते, रवींद्र खरात (दोघे रा. गुरुवार पेठ), अन्सार आतार, योगेश दत्तात्रय शिंदे, मुन्ना सलीम बागवान (सर्व रा. शनिवार पेठ), संतोष कांबळे, योगेश चोरगे (दोघे रा. रविवार पेठ), निशिकांत पिसाळ, दत्ता तोडकर, सागर काळोखे (सर्व रा. करंजे), मयूर बल्लाळ (रा. प्रतापगंज पेठ), नाना इंदलकर (रा. तांदूळआळी) यांच्यासह वाई, पाचगणी, खेड शिवापूर, रहिमतपूर, पुणे येथील अन्य 100 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

आनेवाडी टोलनाक्‍याच्या व्यवस्थापन बदलावरून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये सुरूची बंगल्यासमोर धुमश्‍चक्री झाली. तत्पूर्वी त्याच दिवशी सायंकाळी उदयनराजे यांनी आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोल वसुली बंद पाडली होती. त्यामुळे आमदार व त्यांच्या समर्थकांची साताऱ्यात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाली. त्यांच्याकडून मोठ्या संख्येने युवक जमा झाले होते. सर्वजण आनेवाडी टोलनाक्‍याकडे जाणार होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना तिकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आमदार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने शासकीय विश्रामगृहावर जमले होते. टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय पुढे गेल्यामुळे खासदारांनी टोलनाका व आमदारांनी विश्रामगृह सोडले. त्यानंतर दोन्ही गटांत सुरूची बंगल्यासमोर राडा झाला. त्या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दोन्ही गटांवर दाखल झाले आहेत. 

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार दोन्ही गटांवर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल (ता. 11) टोलनाक्‍यावर जमाव जमवल्याप्रकरणी खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. रात्री उशिरा आमदार समर्थकांवर शहर पोलिस ठाण्यातही जमाव व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक सतीश अस्वर तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT