पश्चिम महाराष्ट्र

कर्मवीरांच्या "मुष्टीफंडा'ची जादू कायम 

दिलीपकुमार चिंचकर

सातारा - येथील रा. ब. काळे प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी फिरून "एक मूठभर धान्य' मागून 700 किलो धान्य जमा केले आहे. धनणीच्या बागेतील वसतिगृहात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांनी दाखविलेली ही "कणव' सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या मुष्टीफंडाचा कित्ता गिरविला. हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. 

गरीब मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील धनणीच्या बागेत वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहास प्रारंभी शासनाची कोणतीही मदत नव्हती. वसतिगृहातील अठरापगड जातीच्या मुलांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हा कर्मवीरांनी खेड्यापाड्यात फिरून नागरिकांना मूठभर धान्य देण्याचे आवाहन केले. कर्मवीरांच्या या मुष्टीफंडाला समाजाने भरभरून मदत केली. मूठभर धान्याच्या मदतीतून कर्मवीरांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कर्मवीरांचाच हा कित्ता आता कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेतील छोटे विद्यार्थी गिरवत आहेत. 

शासनाच्या महिला व बालविकास विभागाने वसतिगृहाबाबतचे नियम बदलल्याने धनणीच्या बागेतील वसतिगृह बंद करावे लागले. पण, महात्मा गांधी, शाहू महाराजांनी गौरविलेले संस्थेचे हे वसतिगृह संस्थेने पुन्हा स्वबळावर सुरू केले. आता या वसतिगृहात विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आसरा दिला आहे. पन्नासच्या वर मुले रा. ब. काळे शाळेत शिकतात. शासनाच्या मदतीशिवाय समाजाच्या मदतीवरच "रयत' हे वसतिगृह चालविणार आहे. त्यास हातभार लागावा यासाठी रा. ब. काळे शाळेने आगळा उपक्रम राबविला. कर्मवीरांचा "मुष्टीफंड' पुन्हा राबविण्याचा संकल्प मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यास होकार दिला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील घराघरात फिरून नागरिकांना मूठभर धान्याचे दान मागितले. शाळेतील शिक्षक, शिक्षिकाही त्यांच्याबरोबर फिरल्या. नागरिकांनीही मुलांना भरभरून धान्य दिले. त्यातून तांदूळ, गहू, ज्वारी असे 700 किलो धान्य जमा झाले. हे धान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाकडे सुपूर्त करण्यात आले. छोट्या विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दाखविलेली ही "कणव' सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT