पश्चिम महाराष्ट्र

अंधश्रद्धा उठतेय ‘शेतकरी मित्रा’च्या जिवावर

सकाळवृत्तसेवा

सातारा - आधुनिक युगात अनेक अंधश्रद्धांचा भांडाफोड होत असला, तरी गुप्त धनाचा हव्यास अजूनही मानवी स्वभावर गारूड घालत आहे. हेच ‘गारुडी’ शेतकऱ्यांचा मित्र असलेला मांडूळ या बिनविषारी सापासाठी लाखो रुपये खर्चाची तयारी करत आहेत. दुर्धर आजार, लैंगिक क्षमता वाढविण्याची लस यासाठीही या सापाची तस्करी होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रबोधनाबरोबरच कडक कायद्याची व त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. 

वन्य जीव अभ्यासकांच्या माहितीनुसार ‘हेड सॅंड बोआ’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सापाची आपल्या भागात मांडूळ किंवा दुतोंड्या अशी ओळख रूढ आहे. मऊ मातीमध्ये हा साप स्वत:ला गाडून घेतो. पावसाळ्यात त्याचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. दिसायला अजगराप्रमाणे असणारा मांडूळ हा साप पूर्णपणे बिनविषारी, निरुपद्रवी व मंद हालचाल करणारा आहे. तो रंगाने पिवळसर, काळसर, तपकिरी व तांबूस असतो. तोंडाच्या आणि शेपटीच्या भागाचे आकारमान जवळपास एकसारखे असते. त्यामुळे नेमके तोंड व शेपटी कुणीकडे हे कळत नाही. 

कुष्ठरोगाच्या गैरसमजुतीने संरक्षण
हा साप वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ नुसार शेड्यूल चारमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या सापाच्या चावण्याने व्यक्तीला कुष्ठरोग होतो, अशी एक गैरसमजूत होती. या समजुतीमुळेही ग्रामीण भागात त्याच्या वाट्याला कोणी जात नसे आणि अनायासे या सापाला संरक्षण मिळत होतो; पण आता मात्र अंधश्रद्धा, गैरसमजुती व वास्तुशास्त्रातील उपयोगामुळे या सापाला वाढती मागणी आहे. हा साप घरात विशिष्ट दिशेला पाळल्यास धन- संपत्ती मिळते, अशी गैरसमजूत आहे. काही भोंदू लोक सापाचा उपयोग कथित काळ्या जादूसाठी करतात. 

टेस्टर लाइट लागल्यास जादा भाव
कथित गुप्तधनाच्या शोधासाठी मांडूळ सापाचा वापर केला जातो. प्रत्यक्षात मांडुळाचा असा कोणताही उपयोग होत नाही. इलेक्‍ट्रिक करंट आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीचा ‘टेस्टर’ लावला जाणारा टेस्टर यातील काही सापांना लावला, तर टेस्टरमधील लाइट लागतो, असा समज आहे. अशा लाइट लागणाऱ्या सापांना अधिक किंमत दिली जाते, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात टेस्टर लावल्यानंतर लाइट लागणारा असा साप अद्याप कोणालाही पाहायला मिळालेला नाही. 

वजनावर ठरतो दर
मांडुळाचे वजन किती यावरही त्याचा दर ठरतो. दोन किलोपेक्षा जादा वजनाचे सापच गुप्तधनापर्यंत नेतात, अशी आणखी एक उपअंधश्रद्धा आहे. त्यातही तीन किलो ७०० ग्रॅम वजनाच्या सापाला सर्वाधिक रक्कम दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चांगली किंमत मिळावी म्हणून मांडूळ सापाचे वजन वाढविण्यासाठी तस्कर अघोरी प्रयोग करतात. त्याच्या शेपटीच्या भागाकडे छर्रे भरणे किंवा तोंडात नाल्यातील माती भरूनही त्याचे वजन वाढविले जाते.

गुप्तधनाचा शोधक
शेतकऱ्यांचा हा मित्र अंधश्रद्धेमुळे संकटात सापडला आहे. हा साप गुप्तधन मिळवून देतो, अशी चर्चा सुरू झाली. धन असते, त्याच्या जवळपास या सापाला आगळीवेगळी चकाकी येते, तसेच धनाच्या दिशेनेच हा साप सरपटत जातो. जणू मार्गदर्शकाचेच काम तो करतो, अशा अफवा पसरविल्या गेल्या. या अंधश्रद्धेपायी आजपर्यंत निवांत फिरणाऱ्या मांडुळाच्या मागे माणसांच्या टोळ्या हात धुऊन लागल्या आहेत. या सर्पासाठी काही लोक लाखो ते कोटीपर्यंत रक्कम मोजण्यास तयार आहेत. धनसंचय, गुप्त धन, दुर्धर आजार, वजनवाढ, लैंगिक उत्तेजन वाढीसाठीची लस तयार करण्यासाठीही मांडूळ जातीच्या सापाची तस्करी केली जाते.

तस्करांच्या टोळ्या वाढल्या
मांडुळाच्या खरेदी- विक्रीतून मालामाल होण्याची संधी अनेकांना खुणावू लागली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या रुग्णांची गरज भागवून लखोपती होण्याच्या हव्यासापायी तस्करांच्या टोळ्या शेतकरी मित्र असलेल्या मांडुळाच्या जिवावर उठल्या आहेत. कथीत सर्पमित्रांचाही यामध्ये सहभाग होऊ लागला आहे. या सापांच्या अस्तित्वासाठी हे धोकादायक आहे. त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी कडक उपाय योजना करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT