karhad
karhad 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड पालिकेत स्वच्छ सर्वेक्षणच्या निधीत अपहार 

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नविन ट्रॉली खरेदीत मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा रोहणी शिंदे यांच्यासह आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ठेकादारास हाताशी धरून आर्थिक घोटाळा केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून त्याच कागदपत्रांच्या अधारावर वर्क ऑर्डर काढून संबधितांनी दोन लाख तीस हजरांची रक्कम हडप केली आहे. त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इमतियाज बागवान यांनी आझ पत्रकार परिषदेत केली. त्या प्रखरणात मुख्याधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व नगराध्यक्षा शिंदे यांना अपात्र कारवे, अशीही मागणी बागवान यांनी केली आहे. 

बागवान यांनी केलेल्या मागमीत मुख्याधिकारी डांगे यांच्यासह नगराध्यक्षा सौ. शिंदे, पालिकेचे आरोग्य निरिक्षक मिलींद शिंदे, उपअभियंता आऱ. डी. भालदार, तत्कालीन सहायक खरेदी पर्यवंक्षक धन्वंतरी साळुंखे, अंतर्गत लेखा परिक्षक सुंदर गोसावी आणि ठेकेदार हैदर पटेल यांच्यावर शासनाकडून आळेल्या दोन लाख तीस हजारांच्या निधीचा पालिकेचा आर्थिक नुकसान केल्याचा आरोप त्यांनी ठेवला आहे. त्यांच्यावर शासनाच्या निधीत अफहार केला आहे. त्यामुळे पालिकेस आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्दा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बागवान यांनी स्वच्छ अभियानाच्या संचालक यांच्याकडे केली आहे. त्याबाबत बागवान यांनी पत्रकार परिषेदत सविस्तर माहिती दिली.

बागवान म्हणाले, मुख्याधिकारी डांगे यांच्यासह आऱोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकदारास हाताशी धरून निदी हडप केला आहे. ट्रॉलीसाठी सुमारे दोन लाख नव्वद जारांची निवीदा पालिकेने ऑक्टोबरमध्ये काढली होती. त्यानुसार हैदर स्टील वर्कसने त्यांची निविदा दोन लाख 89 हजार 129 रूपायास भरली. ती मंजूरही झाली. त्यानंतर हैदर स्टील वर्क्सने नोव्हेंबर मध्ये ती ट्रॉली तराय़ झाली आहे, असे पालिकेत कळवले. त्यानुसा पालिकेच्या कागदपत्रानुसार ती ट्रॉली जमाही केली आहे. त्याबबातची पूर्तता झाली आहे. त्यात स्टोअर विभागानेही ती ट्रॉलीबाबतची पूर्तता केल्याचा लेखी अङवाल दिला. त्यानुसार हैदर स्टीलला त्यांच्या 2 लाख 89 हजारपैकी 2 लाक 30 हजारांची रक्कम अधा करण्याचा अहवाल घेवून ती रक्कमही पालिकेने अदा केली आहे. त्या सगळ्या व्यवहाराची माहिती आम्ही माहितीच्या अधिकाराखाली मागवली. त्यानुसार पालिकेने माहिती दिली. त्या ट्रॉलीचा चॅसी नंबर दिला. त्यावरून आम्ही पुन्हा आरटीओ कार्यालयातून त्याची माहिती मागवली त्यावेळी ती ट्रॉली एस. बी. स्टील वर्क्सकडून पालिकेस विकल्याचे तो व्यवहार एप्रिलमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पालिकेने नोव्हेंबरमध्ये केलेला व्यवहार कागदोपत्री खेळ होता. वाजवी किंमत 2 लाखा 89 हजार नाममात्र होती. त्यातील अधा झालेली रक्कम 2 लाख 30 हजार तो कोणालाच दिली गेली नाही. वास्तविक त्या रकमेचा अपहार झाला आङे. तो अपहार मुख्याधिकारी डांगे, नगराध्यक्षा सौ. सिंदे, आरोग्य निरिक्षक शिंदे, आरोग्य उपअभियंता भालदार, तत्कालीन खेरदी पर्यवेक्षक साळुंखे व ठेकेदार हैदर पटेल यांना संगनमताने केला आहे. एस. बी. स्टील कडून खरेदी झालेल्या ट्रॉलीचे पैसे कोणी दिली. त्याची खरेदी मुख्याधिकारी कऱ्हाड पालिका यांच्या नावाने कशी त्या सगळ्याची उत्तरे त्यांच्या गैरव्यवहार दडली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये झालेला 2 लाख तीस हजरांचा व्यवहार अफहारासाठी होता. तर एस. बी. स्टिलचा व्यवहार नियमबाह्य आहे. त्यामुळे त्यातही एक लाख 40 हजारांचा गैर व्यवहार दिसतो आहे. त्या सगळ्याची चौकसी करून फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी स्वच्छ सर्वेक्षण संचालक यांच्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT