second movement of Robin Hood in Akkalkot against Hungry victims Problem
second movement of Robin Hood in Akkalkot against Hungry victims Problem  
पश्चिम महाराष्ट्र

अक्कलकोटला भुकबळीच्या विरोधात ' रॉबिन हुडची' दुसरी चळवळ

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी ' या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे. ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत पोचवणार आहे.

त्यामुळे अक्कलकोट शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जादा झालेले अन्नाची नासाडी सुद्धा थांबणार आहे. ही आर्मी जगभरातील १७ विविध देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची शाखा अक्कलकोटमध्ये व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. त्याला रशीद खिस्तके या तरुणांने पुढाकार घेऊन मूर्त स्वरूप प्राप्त करून दिली आहे. शहरात मैत्री दिनाच्या औचित्याने १६० जणांना अन्नदान करुन सुरवात करण्यात आली. शिल्लक असलेले जेवण टाकून देण्यापेक्षा ते गोरगरीबांची भूक भागविण्यासाठी कामी यावे या उद्देशाने राॅबिनहुड आर्मीची सुरुवात अक्कलकोटमध्ये करण्यात आली, असे राॅबिनहुड आर्मी अक्कलकोटचे समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी सांगितले.

१ ॲागस्ट ला अक्कलकोट येथे आम्ही याची सोशल मिडिया द्वारे सुरुवात केली आणि या ग्रुपमध्ये १४३ स्वयंसेवकांनी स्वईच्छेने सहभाग नोंदविला आहे. त्याला अक्कलकोट येथील लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळाने प्रतिसाद देत त्वरेने दखल घेत मैत्री दिनाचे औचित्य साधुन अनेक तरुणांना सोबतीला घेत १६० जणांचे जेवण अक्कलकोट शहरातील स्वामी समर्थ समाधी मठ , शेख नुरदीन दर्गा ,कांदा बाजार ,एस टी स्टॅड या परिसरातील गोरगरीबापर्यंत पोहोचविण्याचे काम करुन अक्कलकोट शहरामध्ये एक सामाजिक संदेश दिला आहे.

सदर अन्नवाटपासाठी अक्कलकोट शहरातील संजय जमादार, सागर शिरसाठ, अनंत क्षीरसागर, बाळा वाघमारे, छोटु कोळी, आकाश शिंदे  या स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले. अक्कलकोट शहरामध्ये लग्नकार्यात, घरगुती कार्यात व हाॅटेलमध्ये अन्न शिल्लक राहिल्यास ९०४९१२३३३६, ९९६००७०७३९ या क्रमांकावर कळवावे असे आवाहन समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी केले आहे.राॅबिनहुड आर्मी अक्कलकोट याला प्राचार्य हिंदुराव गोरे व प्रा. अनिकेत चनशेट्टी हे मार्गदर्शन करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT