Seventy year olds have lost their path in solapur
Seventy year olds have lost their path in solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सत्तर वर्षांच्या लालचंद आजोबांना जायचयं घरी! 

परशुराम कोकणे

सोलापूर : साखर पेठेतील मुत्यालम्मा मंदिराजवळ गेल्या दोन दिवसांपासून पडून असलेल्या लालचंद धानू पवार या सत्तर वर्षाच्या आजोबांना सामाजिक कार्यकर्त्यांनी आधार दिला आहे. बुलढाणा परिसरातील मलकापूर पाणी टाकीजवळ घर असल्याचे आजोबा सांगत आहेत. त्यांना घरी पोचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

लालचंद पवार हे हे भुकेने व्याकुळ होवून पडले होते. स्मरणशक्‍ती कमी झाल्याने लालचंद आजोबांना ते सोलापुरात कसे आले हे सांगता येत नव्हते. अखिल भारत नागरिक ग्राहक महासंघाच्या सदस्यांना याबाबतची माहिती मिळाली. महासंघाचे अध्यक्ष रवींद्र जोगीपेठकर, सचिव मधुकर मडूर, सुदर्शन बत्तुल, जयराज गोसकी आदी कार्यकर्त्यांनी धाव घेतली. त्या वृद्ध आजोबाची भेट घेवून आपुलकीने संवाद साधला. खाऊ-पिऊ घालून त्यांना बोलते केले. आजोबांनी आपले नाव लालचंद धानु पवार असे सांगितले. 

सुतार काम करणाऱ्या लालचंद आजोबांच्या पत्नीचे नाव रमा आहे. भाऊ विजय, मुलगा दिनेश यांचीही नावे त्यांनी सांगितली. बुलढाणा जवळील मलकापूर पाणी टाकी जवळ राहण्यास असल्याची माहिती संवादातून समोर आली. मला घरी जायचे आहे असेही ते म्हणाले. श्री. जोगीपेठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी लालचंद आजोबांना साखर पेठ पोलीस चौकीमधील ठाणे अंमलदार भोई यांच्याकडे सोपविले आहे. लालचंद आजोबांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना सुखरूप घरी पाठविण्याचे आश्वासन पोलिसांकडून मिळाले आहे. लालचंद आजोबांना घरी पाठविण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे श्री. जोगीपेठकर यांनी सांगितले. 

लालचंद पवार आजोबा सोलापुरात कसे आले हे समजले नाही. त्यांना घरी जायचे आहे. आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. उपचारानंतर त्यांच्या कुटूंबीयांचा शोध घेण्यात येणार आहे. ते घरी पोचेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. 
- रवींद्र जोगीपेठकर, अध्यक्ष, अखिल भारत नागरिक ग्राहक महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT