Prakash Ambedkar
Prakash Ambedkar 
पश्चिम महाराष्ट्र

LokSabha 2019 : पवार-फडणवीस दोघेही धर्मवादी-जातीयवादी : प्रकाश आंबेडकर

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सोलापूर मधील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाऊन अॅड. आंबेडकरांनी सदिच्छा भेट दिली.  त्यावेळी ते बोलत होते. अॅड. आंबेडकर म्हणाले, "भाजप-शिवसेनेचे नेते संपूर्ण राज्यात सांगत आहेत की आमची लढाई बहुजन वंचित आघाडीबरोबर आहे. ते पाहता आमची ताकद वाढली आहे हे सिद्ध झाले आहे. निधर्माचे पुरस्कर्ते असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी, पवार व फडणवीस हे दोघेही धर्मवादी व जातीयवादी आहेत."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीव्यवस्थेला विरोध होता. अशा वेळी, आपल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची नावे आपण जातीसह प्रसिद्ध कशी केली, असे विचारले असता अॅड. आंबेडकर म्हणाले, "राखीव मतदारसंघातील उमेदवार मागासप्रवर्गातील असतात, त्या ठिकाणी काही अडचण नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारही कोणत्या जातीचा आहे हे मतदारांना समजायला हवे. काँग्रेस, भाजप व शिवसेना या पक्षांचे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची जात पाहिली तर ते ठराविक जातीपुरती मर्यादित असतात, आम्ही मात्र सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून संधी दिली आहे. काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षांनीही त्यांच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नावे जातीसह प्रसिद्ध करावीत, त्यामुळे त्यांचा कल कुणाकडे आहे हे समजेल. हे पक्ष जेंव्हा खुल्या प्रवर्गामध्ये मागासवर्गीय उमेदवरांना संधी देतील त्यावेळी जातीअंताची खऱ्या अर्थाने सुरूवात होईल''. 

उजनीच्या पाण्याचे नियोजन झाले नाही :
उजनी आणि कोयना धरणातून जे अतिरीक्त पाणी पुढे जाते त्याचे नियोजन होणे आवश्यक आहे, असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले,  ''सांगली शहर पाण्याखाली येऊ नये यासाठी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. उजनीतूनही अतिरीक्त पाणी पुढेच जाते. हे आणखी किती दिवस चालणार. जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे वाया जाणारे पाणी असे चित्र आहे. सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी उजनीच्या नियोजनाबाबत गांभीर्याने घेतले नाही आणि विकासाला प्राधान्यही दिले नाही.''

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT