shikhar-shingnapur
shikhar-shingnapur 
पश्चिम महाराष्ट्र

शिखर शिंगणापूर येथे शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा उत्साह

रुपेश कदम

मलवडी - शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसेच यानिमित्त मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत मोठ्या साहसाने ध्वज बांधण्याचा म्हणजेच मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 

रात्री बारा वाजता महापूजा करुन विधिवत पद्धतीने शिव-पार्वती विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. गुलाबी रंगाची उधळण करित, ज्वारीच्या अक्षता टाकत, मंगल अष्टकांच्या साथीने भक्तिमय वातावरणात शिव-पार्वती विवाह संपन्न झाला. याप्रसंगी शाही ढोल नगारे यांचा निनाद करण्यात आला. हर हर महादेव या भाविकांच्या गर्जनेने अवघा महादेव डोंगर व परीसर दुमदुमला. या सोहळ्यास विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह संपुर्ण महाराष्ट्रातून वर्हाडी मंडळी आली होती. विवाह प्रसंगी जिराईतखाने, साळी, कोष्टी, कोळी, माळी, वाघमोडे यांचा मान असतो. लग्न विधिवत पध्दतीने पार पडल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत सर्व मानकरी बोहल्यावर रंग खेळण्याचा खेळ खेळतात. रंगाची उधळण करुन शिव-पार्वती लग्नोत्सव सोहळा कोळी समाजासह बडवे, जंगम, गडशी, गुरव, मानकरी, सेवाधारी व भक्त-भाविक यांनी साजरा केला.

शंभू महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) या मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्याचा यावर्षीचा मान मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस जि.उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला मिळाला आहे. दुपारी दोन वाजलेनंतर वाजत-गाजत मंदिर परिसरात ध्वज आणण्यात आला. दुपारी चार वाजलेपासून ध्वज बांधण्यास सुरुवात करण्यात आली. ध्वज बांधताना त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे असते यालाच देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधतात. सुमारे दिडशे मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. गुढीपाडव्याला या वस्त्राची पूजा करुन मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. चैत्र पंचमीच्या रात्री बारा वाजता शिव-पार्वतीला हळद लावून मुख्य यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेतील आजच्या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, चंद्रकांत खाडे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT