satyajit tambe sakal
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा : आरक्षणासाठी इच्छुकांचे देव पाण्यात

आज सोडत; नगरसेवकपदासाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

सकाळ वृत्तसेवा

शिराळा : नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी उद्या (ता. १३) आरक्षण जाहीर होणार असल्याने प्रभागनिहाय इच्छुकांनी धाकधूक वाढली आहे. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगरसेवकपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपल्याला पोषक असणारे आरक्षण पडावे यासाठी त्यांनी देव पाण्यात घातले आहेत.

गत पंचवार्षिकमध्ये पहिल्यांदा स्थापन झालेल्या नगरपंचायतीवर आपलाच झेंडा फडकण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार मानसिंगराव नाईक, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी आमदार शिवाजीराव नाईक व काँग्रेसच्या माध्यमातून सत्यजित देशमुख यांच्यात तिरंगी लढत दिली. यात आमदार मानसिंगराव नाईक यांनी ११ उमेदवारांच्या माध्यमातून बाजी मारली. शिवाजीराव नाईक यांनी सहा उमेदवारांच्या माध्यमातून नगरपंचायतीत विरोधी पक्ष म्हणून प्रवेश केला. सत्यजित देशमुख यांचा एकही उमेदवार निवडून न आल्याने सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यापूर्वी बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुकीत मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी आघाडी करून शिवाजीराव नाईक यांना आमदार असताना सत्तेपासून दूर ठेवले. ऐन नगरपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी होऊन तिरंगी लढत झाली होती.सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाजीराव नाईक यांनी भाजपातून राष्ट्रवादीत आल्याने आत्ताचे चित्र बदलले आहे.

आत्ताची नगरपंचायत निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार. त्यामुळे मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात सत्यजित देशमुख, रणजितसिंह नाईक व सम्राट महाडिक यांना टक्कर द्यावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी नाईक-देशमुख यांना टक्कर देत बाजी मारली होती. सध्या चित्र बदलले असून, तालुक्यात नाईक विरुद्ध देशमुख असे चित्र आहे. या निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून आमदार नाईक यांनी चार वर्षांत चार महिलांना नगराध्यक्षा होण्याची संधी दिली आहे. पहिल्यांदा सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे, सुनीता निकम व प्रतिभा पवार यांना संधी दिली. त्याच बरोबर उपनगराध्यक्षपदी किर्तीकुमार पाटील व सध्या विजय दळवी यांना संधी दिली. विविध सभापतीपदी संधी प्रत्येकाला देऊन राजकीय समतोल कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने शिराळा शहरात राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. त्यांना सत्यजित देशमुख, रणजित नाईक व सम्राट महाडिक यांना कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. शिवाय काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, मनसे व इतर पक्ष यांची संयुक्त भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT