Shiv Sena's closing arm decides
Shiv Sena's closing arm decides 
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेचा बंद लखोटा निर्णायक

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहात चार तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत शिवसेनेचा मुंबई येथून आलेला लखोटाच भारी ठरला. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रत्येक गटाने सभापतीपदावर दावेदारी केली होती. शिवसेना नेत्यांमधील आपापसातील वाद मिटत नसल्याने अखेर मुंबईतून आलेली चिठठी उघडण्यात आली. त्यात हंबीरराव पाटील, प्रवीण यादव व स्वाती सासणे यांनी सभापतीपदाची लॉटरी लागल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक आज दुपारी झाली. दरम्यान सकाळी आठपासूनच सर्किट हाउस येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेते आणि सदस्यांच्या बैठकी झाल्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक घेतली. तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरुडकर, उल्हास पाटील व जिल्हा प्रमुख विजय देवणे उपस्थित होते. 

शिवसेनेच्या वाट्याला बांधकाम, शिक्षण आणि समाजकल्याण सभापतीपदे आल्याचे सांगण्यात आले. आमदार आबिटकर यांनी वंदना जाधव यांच्यासाठी शिक्षण समितीची मागणी केली. नरके यांनी कोमल मिसाळ किंवा मनीषा कुरणे यांना समाजकल्याण सभापतीपदाची मागणी केली. तर सरुडकर यांनी हंबीरराव पाटील यांना बांधकाम समिती सभापती करण्याची मागणी केली. उल्हास पाटील यांनी स्वाती सासणे यांच्यासाठी समाजकल्याण सभापतीपदाचा आग्रह धरला. डॉ. मिणचेकर यांनी यादव यांना बांधकाम सभापतीची मागणी केली. प्रत्येक नेत्याना आपल्या गटाला न्याय का मिळाला पाहिजे?, त्याची माहिती दिली. मात्र नावावर एकमत होत नसल्याने शिवसेनाभवन येथून आलेला बंद लखोटा अखेर खोलला. या लखोट्यात हंबीरराव पाटील, यादव , सासणे यांना लॉटरी लागली. यानंतर शिवसेनच्या शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील यांची भेट घेत अंतीम केलेल्या नावाची यादी दिली. 

सेना सभापतींचे घेतले राजीनामे 
जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्वाची राहिली आहे. शिवसेनेचे सर्व गट एकत्र राहिल्याने महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेला यावर्षी तीन तर पुढच्या वर्षी दोन सभापतीपद देण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घेतली आहे. मात्र पहिल्या वर्षीच सर्व इच्छुकांना सभापतीपद हवे होते. त्यावरुन बराच काळ गोंधळ झाला. अखेर पुढच्या वर्षी उर्वरीत सदस्याला संधी देण्याचा निर्णय झाला. नंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास नकार देण्याचा प्रश्‍न उदभवू नये म्हणून त्यांचे राजीनामे घेण्यात आले. 

जाधव, मिसाळ व कुरणेपैंकी एक 
शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाला पुढील वर्षी सभापतीपद दिले जाणार आहे. आबिटकर यांचे समर्थक अरुण जाधव यांच्या पत्नी वंदना यांना ही संधी दिली जाईल. तर चंद्रदीप नरके गटातून मिसाळ किंवा कुरणे यांच्यापैकी एकाला सभापतीपदाची संधी दिली जाईल 

अमर पाटील यांच्या डोळ्यात अश्रू 
अपक्ष उमेदवार रसिका पाटील यांचे पती अमर हे सत्ता बदलाच्या घडामोडीत आघाडीवर होते. त्यांनी बांधकाम समिती सभापतीपदाची मागणी केली होती. अखेरपर्यंत त्यांना पद मिळण्याची खात्री होती. अनेक शिष्टमंडळांनी मंत्री पाटील यांची भेट घेवून पदासाठी दावेदारी केली, मात्र बांधकाम सभापतीपदाची माळ शिवसेनेच्या हंबीरराव पाटील यांच्या गळ्यात पडली. ही माहिती मिळताच अमर यांच्या डोळ्यात अश्रू आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT