पश्चिम महाराष्ट्र

घाटगे - मुश्रीफ गटाचे शिवजयंती कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शन

सकाळवृत्तसेवा

कागल - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी आणि मोठया जल्लोषात आज साजरी करण्यात आली. समरजीत घाटगे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे तर आमदार हसन मुश्रीफ यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यातून दोघांनीही शक्तीप्रदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी विविध गड किल्यावरून जल आणि माती आणली. त्याचं स्वागत छत्रपती शाहू साखर आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी लक्ष्मी टेकडी इथे केले. तर विविध गडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाहू गार्डन इथे करण्यात आले. त्यानंतर मिरवणूकीने शिवज्योत बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आणण्यात आली. आमदार हसन मुश्रीफ हातात शिवज्योत मिरवणूकीत सहभागी झाले होते.

मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहीद जवान स्मृती देखावा साकारण्यात आला होता. भगवे फेटे परिधान केलेल्या महिला आणि पुरुष, छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देत, शिवाजी पुतळ्याजवळ आल्या. आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दूग्ध आणि जलाभिषेक घातला.

यावेळी महापौर सरिता मोरे, भैय्या माने, नवीद मुश्रीफ, नुतन गाडेकर, रमेश माळी, प्रविण काळबर, नितिन दिंडे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT