पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांना वीज जोडणी मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले.

यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज जोडणीची कामे लवकर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नाही म्हणून महावितरण कंपनीने गाजावाजा करत उच्च दाब वितरण प्रणालीतून तातडीने जोडणी देणार असे जाहीर केले होते. पण अद्याप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे भरून वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५,०६०, तर सांगली जिल्ह्यामध्ये १०,७७५ इतकी आहे. विद्युत लोकपाल यांनी २६ ऑक्टोबर २०१८ ला दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. मराठवाडा, विदर्भासाठी शासनाचे धोरण वेगळे व उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळे, असा भेदभाव कशासाठी केला जात आहे. 

- संजय पवार, जिल्हाप्रमुख

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रगती झाली पाहिजे. पण, वर्षाकाठी काही शेकडो कोटी तोटा सहन करून काही भागांना न्याय व पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय हे घातक आहे. इथल्या शेतकऱ्यांनी व उद्योजकांनी काय पाप केले आहे. कोणतीही वीज चोरी नाही. वेळेवर विज बिल भरले जाते. असे असतानाही वीज मंडळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. शेतकऱ्यांना वीज जोडणी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

त्यावर अधिकाऱ्यांनी २०२० पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या वीज जोडणीची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

आंदोलनात विजय देवणे, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, शुभांगी पोवार, दुर्गेश लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, अनिल पाटील, विनोद खोत, शांताराम पाटील, आनंद शिंदे, चंद्रकांत भोसले, संतोष चौगुले आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT