पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा : शिवसेना काढणार प्रांत कार्यालयावर मोर्चा

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आक्रमक होण्याचा मार्ग स्विकारला असून तालुक्याला दुष्काळी जाहीर करावे व जळून गेलेल्या खरीप पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व इतर मागण्यासाठी मंगळवेढा शिवसेनेच्या वतीने 24 सप्टेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाअध्यक्ष येताळा भगत यांनी दिली.

याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनात केलेल्या या मागण्यामध्ये शेतीपंपाचे बिल 100% माफ करावे, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून शिरनांदगी तलाव 100% भरून द्यावा व या तलावाच्या सांडव्याची उंची एक मीटरने वाढवावी.,उजनी कॅनालची अपूर्ण काम पूर्ण करून कॅनॉलसाठी संपादीत केलेल्या जमिनीचे बाजारभावानुसार पाचपट  रक्कम त्वरीत द्यावी, वीर/भाटघर धरणाच्या नीरा कालव्याचे 100 % सिमेंटकाॅक्रीटचे अस्तरीकरण करून बचत झालेल्या पाण्यातून तालुक्यातील सिंचनाच्या पाण्यापासून वंचित 24 गावांना लाभ द्यावा, पौट मध्यम प्रकल्पाचे मंजूर काम त्वरीत सूरू करावे. या प्रमूख मागण्याचा यात समावेश आहे. या मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT