पश्चिम महाराष्ट्र

कलशेट्टी, मित्तल यांचे श्रमदान, स्वच्छता मोहिमेचा धडाका

सुधाकर काशिद

कोल्हापूर - ते दोघे उपस्थितीचा फारसा गाजावाजा करत नाहीत. त्यांच्या मागे-पुढे नॅपकीन, पाण्याची बाटली घेऊन शिपाई असत नाही. पायाजवळ कचरा, हातात खराटा व चेहरा कॅमेराकडे अशी ॲक्‍शन ते देत नाहीत. थेट खराटा हातात घेतात आणि कचरा झाडायलाच सुरुवात करतात. फार नाही; पण दीड-दोन तास ते सलग श्रमदान करतात आणि आपल्या कृतीने ते कामचुकारांनाही लाजवून काम करायला भाग पाडतात.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या पद्धतीने श्रमदान व स्वच्छता मोहिमेचा धडाकाच लावला आहे. नवीन आलेले अधिकारी आहेत. काहीतरी चमकोगिरी म्हणून ते स्वच्छता मोहीम घेत असतील. नव्याचे नऊ दिवस झाल्यावर आपोआप थांबतील, अशीच त्यांच्याबद्दल बहुतेकांची प्रतिक्रिया; पण २५ ते ३० ठिकाणांहून अधिक ठिकाणी त्यांनी खराटा, पाटी, खोरे स्वतः हातात घेऊन नव्याचे नऊ दिवस ही समजूत खोटी ठरवलेली असून, त्यांच्या दृष्टीने रविवार म्हणजे सुटी किंवा ताणून देण्याचा दिवस नसून श्रमदानाचा दिवस झाला आहे.

दोघांमुळे पालिका व जिल्हा परिषदेच्या इतर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातात दर रविवारी झाडू येऊ लागला आहे.
मल्लिनाथ कलशेट्टी यांची तर स्वच्छतादूत म्हणून ओळख आहे. आपले घर स्वच्छ झाले की दार स्वच्छ होते. दार स्वच्छ झाले की गल्ली स्वच्छ होते. गल्ली स्वच्छ झाली की परिसर स्वच्छ होतो.

परिसर स्वच्छ झाला की प्रभाग स्वच्छ होतो आणि प्रभाग स्वच्छ झाला की सारा गाव स्वच्छ होतो, अशी त्यांची स्वच्छतेमागील साधी-सोपी भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी ते सहज रंकाळा चौपाटीवर गेले आणि सर्वत्र पडलेले खाऊचे कागद, पिशव्या, कागदी कप, पाण्याच्या बाटल्या पाहून क्षणभर थांबले आणि त्यांनी स्वतःच ते उचलण्यास सुरुवात केली. मग बाकीचेही वाकले. काही नागरिकांनीही सहभाग घेतला.

पंधरा-वीस मिनिटांत चौपाटीचा शालिनी पॅलेससमोरचा भाग बऱ्यापैकी स्वच्छ करून ते गेले. आज तर कसबा बावड्यात नदीकाठावरील कचरा दोन तास श्रमदान करत त्यांनी काढला. यात सीईओ अमन मित्तलही त्यांच्यासोबत सहभागी झाले. पालिका कर्मचारी, नगरसेवक, जागरूक नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी सारा परिसर स्वच्छ केला.

अमन मित्तल यांच्या बाबतीतही असेच त्यांनी सार्वजनिक शौचालयाची भिंत स्वतः रंगवली. केवळ फोटोपुरती त्यांनी ॲक्‍शन दिली नाही, तर संपूर्ण भिंतच हातात रंगाचा डबा व ब्रश घेऊन रंगवून काढली. श्रमदानाला कोठेही बोलवा मी येणारच, असे त्यांनी जाहीरच केले आहे. अनेक जण म्हणतात. या दोन अधिकाऱ्यांनी श्रमदान करून काय फरक पडणार आहे. रोज कचरा साठायचा तसा साठणारच आहे. आपल्यामागे होणारी अशी कुजबूज जरूर त्यांच्या कानावर आहे; पण माघारी असणारी कुजबूज ही प्रेरणाच आहे, असे ते म्हणतात.

नवीन अधिकारी आहे. काही तरी नवीन करणार व नव्याचे नऊ दिवस झाले की थांबणार, असेच आम्हाला वाटत होते; पण आयुक्त साहेबांची स्वच्छतेसाठी असणारी धडपड पाहून आम्हालाही प्रेरणा मिळाली आहे. आम्हीही प्रसिद्धीपेक्षा अशी कामे करत राहिले पाहिजे, असे खरोखर मनापासून वाटते. 
- सरिता मोरे,
महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT