bommai
bommai sakal
पश्चिम महाराष्ट्र

`हावेरी`तील शिग्गावला श्री अरिहंत सूत प्रकल्प उभारावा - मुख्यमंत्री बोम्मई

- राजेंद्र हजारे

बंगळूर : येथे वस्त्रोद्योग प्रकल्पाच्या संदर्भातील बैठकीत चर्चा करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई. शेजारी युवा नेते उत्तम पाटील, आमदार प्रकाश आवाडे, अभिनंदन पाटील व मान्यवर.

बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या श्री अरिहंत सूत गिरणीचा प्रकल्प हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे उभा करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे ठाम आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.बंगळूर येथील त्यांच्या निवास्थानी सोमवारी (ता. ४) आयोजित वस्त्रोद्योग प्रकल्प बैठकीप्रसंगी चर्चेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आश्वासन दिले.

सीमाभागातील बोरगाव येथे मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प आहे. या धर्तीवरच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथेही वस्त्रोद्योग प्रकल्प व्हावा, यासाठी सातत्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने सर्व विभागातील अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा व बैठक बोलविण्यात आली होती. यासाठी विशेष आमंत्रण म्हणून युवा नेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

कर्नाटक शासनाकडून वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्याबरोबरच विविध शासकीय योजनाही राबविण्यात येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात राज्याचा नावलौकिक व्हावा, यासाठी आपण शिग्गाव येथे वस्त्रोद्योग पार्क उभा करीत आहोत. पण यासाठी लागणारी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांकडून व तज्ज्ञांकडून मिळते. बोरगाव येथेही वस्त्रोद्योग पार्क आहे. शिवाय जवळच मॅचेस्टरनगरी इचलकरंजी आहे. याठिकाणी मोठा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. या अनुषंगाने आपण इचलकरंजी व बोरगाव येथील वस्त्रोद्योग व्यावसायिकांशी चर्चा कडून त्याच्या निगडित असलेल्या सर्व घटकांची माहिती घेण्यासाठी आपण ही बैठक बोलविली आहे.

सीमाभागात बोरगाव येथील श्री अरिहंत सूतगिरणी मोठा प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे चालवला आहे. शिगाव येथेही हा प्रकल्प उभारावा. यासाठी लागणारे सर्व शासकीय सहकार्य आपण करण्यास कटिबद्ध आहोत, असेही शेवटी मुख्यमंत्री बोम्माई यांनी सांगितले. अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांनी विशेष अभिनंदन केले. सामाजिक कार्याला आपले नेहमीच साथ राहील असेही सांगितले.

बैठकीप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य राहुल आवाडे, सूतगिरणीचे संचालक दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कार्वेकर, आर. टी. चौगुला, प्रद्युम्न कडोले, नागेश भंडारी, अमित हनुमानवर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT