PHOTO-2020-02-23-13-40-43
PHOTO-2020-02-23-13-40-43 
पश्चिम महाराष्ट्र

प्लास्टीक जागृतीसाठी स्केटिंग ​

सकाळवृत्तसेवा


सांगली : सांगलीच्या राहुल आरबोले स्केटिंग अकॅडमीची दहा वर्षांची खेळाडू सई शैलेश पेटकर हिने नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सांगलीच्या शिरपेचात आणखी एक सन्मान रोवला. सई आता आंतराष्ट्रीय महिला दिनी प्लस्टीक बंदीच्या जागृतीसाठी सांगली शहराला स्केटिंगद्वारे प्रदक्षिणा घालणार आहे. या मोहिमेद्वारे ती प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणार आहे. 

सईने यापूर्वीही सलग एक तास स्केटिंगवर लावणी नृत्य सादर करून तीन पराक्रम केला होता. त्याची दखल काही काही संस्थांनीही घेतली होती. याचबरोबर सईने यापूर्वीही महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची जागृती केली आहे. अनेक मोहिमेत तिने महापालिका प्रशासनाला मदत केली आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या पाचव्या डान्स स्केट स्पोर्ट वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये स्केटिंगवर डान्स करून पहिले पारितोषिक मिळवले. त्यानंतर आता सई प्लास्टीकमुक्तीसाठी प्रयत्न करणार आहे. स्केटिंगद्वारे शहराच्या

प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा घालून सई जनतेला "सिंगल युज प्लास्टीक' न वापरण्याचे आवाहन करणार आहे. आठ मार्च महिला दिनी सकाळी 9 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन शहर प्रदक्षिणेस सुरवात होईल. अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांची प्रमुख उपस्थिती असेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत मारुती रोड मार्गे बालाजी चौकात ती येणार आहे. तिथे महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस स्वागत करतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT