solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

साप, पक्ष्यांचा तस्कर सापडला जाळ्यात!

परशुराम कोकणे

सोलापूर : तस्करीच्या उद्देशाने दुर्मिळ प्रजातीचे चार साप, इगुआना प्रजातीचा सरडा, चार दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, एक विंचू घेऊन प्रवास करणाऱ्या तरुणाला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली. वन विभागाच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली. 

चंद्रभान रंक अमानी (वय 33, रा. भारतीनगर, बारागड, ओडिशा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पुणे येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला. पुण्याहून ओडिशाकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रभान यास भिगवण रेल्वे स्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दुर्मिळ प्रजातींचे चार साप, इगुआना प्रजातीचा सरडा, चार दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, एक विंचू, एक कॅमेरा आणि लॅपटॉप मिळून आले. त्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातून हे वन्यजीव पकडले असण्याची शक्‍यता आहे. वन्यजीवांची तस्करी करून ते परदेशात पाठविण्यात येत असावेत अशी शक्‍यता रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी आरपीएफ आणि वन अधिकाऱ्यांमार्फत संयुक्तपणे सुरू आहे. 

दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी केल्याप्रकरणात चंद्रभान अमानी यास अटक केली आहे. आरोपी हा वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या टोळीतील सदस्य असण्याची शक्‍यता आहे. हे वन्यजीव परदेशात पाठविण्यात येत असावेत, या अनुषंगाने तपास सुरू आहे. 
- जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT