solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सत्ता भाजपची, अभिनंदन राहुल गांधींचे

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानिमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे.

काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, तौफीक हत्तुरे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, प्रवीण निकाळजे, प्रिया माने, वैष्णवी करगुळे यांनी हा प्रस्ताव दिला होता. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेल्या आणि मिनी लोकसभा निवडणूक म्हणून संबोधल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेश
या राज्यात काँग्रेसने उल्लेखनीय यश मिळवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चित फायदा होईल. या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल व मनोधैर्य वाढले आहे. या घवघवीत यशाबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे व काँग्रेस कार्यकर्त्यांचे ही सभा अभिनंदन करीत आहे, असा प्रस्ताव होता. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

काँग्रेस-एमआयएम एकत्रित
सोलापूरच्या राजकारणात नेहमीच एकमेकाला पाण्यात पाहणारे काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक एका जागेच्या प्रस्तावावरून एकत्रित आले.
मुस्लिम पाच्छा पेठेतील जागा सोलापूर बार असोसिएशनला देण्याचा प्रस्ताव भाजपचे नागेश वल्याळ, शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर आणि बसपचे
आनंद चंदनशिवे यांनी दिला होता. मात्र प्रस्तावित जागा ही शासनाची असताना हा प्रस्ताव मंजूर करता येणार नाही, अशी भूमीका एमआयएमच्या 
नगरसेवकांनी घेतली, त्यास कांग्रेसच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर महापौरांसमोरी हौदात एकत्रित येऊन त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे या प्रस्तावासंदर्भात आयुक्त निर्णय घेतील, असा आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT