balasaheb thackeray
balasaheb thackeray 
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसैनिकांचा पुढाकार

विजयकुमार सोनवणे

महापालिकेने दिली निविदेसाठी दुसर्यांदा मुदतवाढ

सोलापूर: महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आता शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने दोनदा निविदा काढल्या. मात्र, एकही मक्तेदाराने निविदा भरली नाही. त्यामुळे आज (मंगळवार) परत निविदेसाठी २३ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या संदर्भात 'सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची तयारी शिवसैनिकांनी केली आहे.

अतिशय गाजावाजा करीत भूमिपूजन झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीला ठेकेदारांनी दोनदा प्रतिसाद दिला नाही. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या स्मारकाच्या कामाला जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी पुढाकार घेतल्याने चालना मिळाली. महापालिकेने पाच कोटी रुपयांच्या कामांची निविदाही काढली. मात्र, एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे महापालिकेने निविदा भरण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

17 नोव्हेंबर 2012ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2012ला सोलापूर महापालिकेने स्मारक बांधण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. विजयपूर रस्त्यालगत रेवणसिद्धेश्‍वर मंदिरजवळ सोलापूर महापालिकेच्या जागेची पाहणी स्मारकासाठी करण्यात आली. नंतर या जागेऐवजी पोलिस मुख्यालयासमोरील मार्कंडेय जलतरण तलावाजवळची जागा या स्मारकासाठी निश्‍चित करण्यात आली. त्याचे 17 नोव्हेंबर 2017ला पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले. मात्र, निविदा दाखल न झाल्याने स्मारकाचे काम पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT