पश्चिम महाराष्ट्र

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश 

शीतलकुमार कांबळे

सोलापूर - सरकारची पूर्वपरवानगी न घेता कामावर गैरहजर असलेल्या राज्यातील 80 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा सरकारी सेवेत रुजू होण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे काही अटी ठेवून रुजू होण्याची संधी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट - अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी विविध कारणास्तव प्रदीर्घ काळापासून गैरहजर होते. यातील काही अधिकारी सरकारची पूर्वपरवानगी न घेता पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गैरहजर होते. सार्वजनिक आरोग्य सेवा ही अत्यावश्‍यक सेवा असल्याने तसेच विभागांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनधिकृतरीत्या गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करून घेण्यात येत आहे. याबाबत काही अधिकाऱ्यांनी विनंती केली होती, याचा विचार करून आरोग्य सेवा संचालनालय संचालकांनी पुन्हा नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला होता. काही अटींच्या अधीन राहून अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश सार्वजनिक विभागाने दिले आहेत. 

अनधिकृतरीत्या गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांचा गैरहजर असल्याचा कालखंड हा सेवेतील खंड समजण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या अनधिकृत गैरहजेरी पूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ देण्यात येणार नाहीत. यात वेतन संरक्षण, वेतनवाढ, जुने निवृत्तिवेतन यांचा समावेश आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT