ST Logo
ST Logo 
पश्चिम महाराष्ट्र

एसटी महामंडळाची लिपिक, टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्षा

सकाळवृत्तसेवा

अक्कलकोट : जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदांच्या जाहिरातीमधील लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) या पदाची ऑनलाईन परीक्षा ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर व १४ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्यामधील विविध ५४  केंद्रांवर ३ सत्रात (म्हणजे सकाळी ९ ते १०. ३० , दुपारी १२. ३० ते २. ०० व सायंकाळी ४ ते ५. ३० ) घेण्यात येणार आहे.

या पदाच्या २५४८ रिक्त जागांसाठी १ लाख ३८ हजार अर्ज महामंडळास प्राप्त झाले आहेत. सर्व उमेदवारांना लघु संदेश (एस एम एस ) व ई-मेलद्वारे  परीक्षा स्थळ, परीक्षेची वेळ व तारीख, आसन क्रमांक कळविण्यात आला आहे . तरी, सर्व संबंधित उमेदवारांनी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र  दि.५ नोव्हेंबर पासून उमेदवारांनी दिलेल्या ईमेल पत्यावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी नियोजित परीक्षाकेंद्रावर वेळेवर परीक्षेस उपस्थित राहावे.

ज्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रांच्या पसंती क्रमांका व्यतिरिक्त इतर ठिकाणी परीक्षाकेंद्र मिळाले होते, अशा सुमारे १८ हजार उमेदवारांना त्यांच्या राहत्या विभागात अथवा जवळच्या विभागात परीक्षाकेंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.याबाबत लघुसंदेश (एसएमएस) त्यांना प्राप्त होतील, तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तसेच परीक्षेसंबंधी काही अडचण निर्माण झाल्यास (उदा. आसन क्रमांक, परीक्षेचे स्थळ)  टोल फ्री क्रमांक. १८००१२१८४१४ यावर संपर्क साधावा असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे जनसंपकॆ अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT