Temperature
Temperature 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरचा पारा उच्चांकी ४५ अंशावर

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. 

सोलापुरात यापूर्वी तीन वेळा ४४.३ अंश सेल्सिअसदरम्यान पारा राहिला होता. सोमवारीही (ता. २०) पारा ४४.३ अंश सेल्सिअस एवढा होता. आज उन्हाचा चटका वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. २७ मेपर्यंत ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील.

हिंगोलीत उष्माघाताचा पाचवा बळी
हिंगोली - शहरातील महात्मा गांधी चौकात आज सकाळी ४५ वर्षीय व्यक्‍तीचा मृतदेह आढळला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. हिंगोली जिल्ह्यात यंदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. दोन दिवसांपूर्वीच आखाडा बाळापूर येथे अनोळखी व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात आज तशीच घटना निदर्शनास आली. जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताने पाच बळी घेतले आहेत. दरम्यान, परभणीतही तापमान ४५.६ अंश सेल्सिअस होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT