20 thousand BJP workers  Mohol Assembly Constituency will join PM  Modi Sabha  in Solapur Lok Sabha Election 2024
20 thousand BJP workers Mohol Assembly Constituency will join PM Modi Sabha in Solapur Lok Sabha Election 2024  
सोलापूर

Solapur News : PM मोदींच्या सोलापुरातील सभेसाठी भाजपची जय्यत तयारी! मोहोळमधून जाणार सुमारे वीस हजार कार्यकर्ते

राजकुमार शहा

मोहोळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 29 तारखेला सोलापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी मोहोळ विधानसभा मतदार संघातून सुमारे वीस हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने यांनी दिली.

सध्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या विरोधात सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे अशी लढत होत आहे. आमदार सातपुते यांना निवडून आणण्यासाठी महायुतीत सामील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर, सतीश काळे, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कार्यकर्ते सज्ज केले आहेत. दरम्यान सोलापूरच्या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, आमदार सातपुते सध्या होम टु होम प्रचार करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT