corona
corona 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात 3633 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात 3 हजार 69 तर महापालिका हद्दीतील 564 असे एकूण 3 हजार 633 एवढेच ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 38 हजार 937 झाली असून त्यातील तब्बल 33 हजार 911 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना मुक्तची संख्या आता 34 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागात 146 तर महापालिका हद्दीत 20 अशा एकूण 166 नव्या कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. 

आजच्या अहवालानुसार 224 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 182 व महापालिका हद्दीतील 42 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार एकूण नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 7 व महापालिका हद्दीतील दोन व्यक्तींचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 31 अहवाल प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 297 कोरोना चाचण्यांचा अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT